HW News Marathi
मुंबई

पश्चिम रेल्वे मार्गावरील जम्बो ब्लॉक रद्द, हार्बर-मध्य रेल्वेवर ब्लॉक

मुंबई | हार्बर मार्गावर कुर्ला-वाशी अप आणि डाऊन मार्गावर रविवार रात्री ब्लॉक घेणार आहे. तर ठाणे-कल्याण जलद मार्गावर रविवारी दिवसभर ब्लॉक मध्य रेल्वेने घोषित केला आहे. पश्चिम रेल्वेने रविवारी असलेला जम्बोब्लॉक रद्द केला आहे. हार्बर मार्गावरील कुर्ला-वाशी अप-डाऊन मार्गावर रविवारी रात्री १.३० ते रविवारी पहाटे ६ वाजेपर्यंत ब्लॉक असेल.

ब्लॉक काळात रविवारी पहाटे सीएसएमटी-पनवेल-वाशी-बेलापूर-सीएसएमटी या मार्गावरील अप आणि डाऊन लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. त्यामुळे हार्बर मार्गावरील प्रवाशांना ट्रॉन्स हार्बर, तर मध्य मार्गावरुन प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच ठाणे-कल्याण डाऊन जलद मार्गावर रविवारी सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते दुपारी ३ वाजेपर्यंत ब्लॉक असेल. प्रवाशांच्या सोयीसाठी ब्लॉक काळातील काही लोकल फेऱ्यांना घाटकोपर, विक्रोळी, भांडूप, मुलूंड स्थानकावर विशेष थांबा देण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील जम्बोब्लॉक रद्द झाल्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे प्रवाशांची रविवारच्या ब्लॉकच्या त्रासातून यंदा सुटका होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्राचे ‘उंदरालय’ सामनातून सरकारवर टीका

News Desk

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा २०२०चा ‘गुढीपाडवा मेळावा’ रद्द

swarit

“सर्वसामान्य गुंतवणूकदारांचा मार्गदर्शक हरपला”, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक

Aprna