Site icon HW News Marathi

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर माजी नगरसेवकांना उद्धव ठाकरेंनी दिला ‘हा’ कानमंत्र

मुंबई | “काम करा आणि वॉर्डमध्ये फिरा,” असा कानमंत्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी माजी नगरसेवकांना दिला आहे. उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “खूप आमिषे दाखवली जातील, पण, कुणाचे ऐकू नका,” असा सल्लाही यावेळी त्यांनी माजी नगरसेवकांना दिला. शिवसेनेच्या मुंबई महानगरपालिकेतील (BMC) माजी नगरसेवकांना उद्धव ठाकरेंनी शिवसेनाभवन मार्गदर्शन आज (12 ऑगस्ट) केले.

तात्कालीन महाविकास आघाडी सरकारने 9 वॉड वाढवून महानगरपालिका वॉर्ड पुर्नरचना करण्याचा निर्णय घेतला होता. आरक्षणाची सोडतीसह सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणूक जाहीर होणे अपेक्षित असताना राज्य सरकारने निर्णय बदलला आहे. तसेच 2017 च्या प्रभाग रचनेनुसार राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुका घेण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे.

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर मुंबई महानगर पालिकेच्या वॉर्ड पुर्नरचनेत बदल करण्यात आला असून या निर्णयाला शिवसेनेने विरोध केला आहे. शिंदे सरकारच्या निर्णयाविरोधात शिवसेना सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री असताना घेतलेल्या निर्णया स्वत: मुख्यमंत्री झाल्यानंतर कसे काय बदलू शकतात, यावर शिवसेनेने आक्षेप घेतला आहे.

 

 

 

 

Exit mobile version