HW News Marathi
मुंबई

स्वत:च्या मृत्यूवरही त्यांनी रेखाटले होते व्यंगचित्र

पुणेः ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर (वय ७८) यांचे सोमवारी रात्री उशिरा पुण्यातील राहत्या घरी निधन झाले. व्यंगचित्राबरोबरच ललित लेख व विविध विषयांवर ते नियतकालिके व वर्तमानपत्रात लिहित. मंगळवारी दुपारी एक वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मंगेश तेंडुलकर अखेरच्या क्षणापर्यंत कार्यरत होते. मागील महिन्यातच त्यांच्या व्यंगचित्रांचे प्रदर्शन पुण्यात भरले होते. त्यांच्या प्रत्येक प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद मिळत असत. प्रत्येक विषयावर ते परखडपणे भाष्य करत. व्यंगचित्राबरोबरच पुण्यातील सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातही ते हिरिरीने भाग घेत. पुण्यातील वाहतूक समस्येसाठी ते रस्त्यावर उतरले होते. ते नियमितपणे कर्वे रस्त्यावर उभे राहून वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी जनजागृती करत. मागील १७ वर्षांपासून त्यांचा हा शिरस्ता सुरू होता

अनेक व्यंगचित्रकारांचे प्रेरणास्त्रोत असलेले मंगेश तेंडुलकर हे समाजातील प्रत्येक घटनेकडे तटस्थपणे पाहत. वयाच्या सत्तरीनंतर त्यांनी कॅरिकेचर्स काढण्यास सुरूवात केली. या वयातही त्यांनी नवीन शिकायची उर्मी बाळगत त्यात हातखंडा मिळवला होता. त्यांनी स्वत:च्या मृत्यूवरही व्यंगचित्र काढले होते, हे विशेष.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्थानिकांच्या सहकार्यातून ए.पी मंडई अद्यवायत करण्याचा विचार | रविंद्र वायकर

News Desk

ओम पुरी यांना विविध मान्यवरांची श्रद्धांजली

News Desk

छगन भुजबळांच्या प्रकृतीची विधानपरिषद सभागृहात चिंता योग्य उपचार करण्याची धनंजय मुंडे यांची मागणी

News Desk