HW Marathi
देश / विदेश

आता लॅपटॉप बॉम्बचा जगाला धोका,

 

वृत्तसंस्था।  अल कायदा आणि आयएस या दहशतवादी संघटनांनी विशेष प्रकारचे बॉम्ब तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. हे बॉम्ब केवळ लॅपटॉप नव्हे तर इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणातही बसवता येणार आहेत. याच कारणास्तव अमेरिका आणि ब्रिटनने ८ मुस्लिम बहूल देशातील रहिवाशांना विमानातून प्रवास करताना इलेक्ट्रॉनिक वस्तू नेण्यास बंदी घातल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

अतिरेकी संघटना इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या सहाय्याने विमानात स्फोट घडवून आणण्याची भीती असल्याची खबर गुप्तचर विभागाने दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं अमेरिकेच्या होमलँड सिक्युरिटी डिपार्टमेंटने म्हटल्याचं सीबीएस न्यूजचं म्हणणं आहे. अतिरेक्यांचे पुढचे टार्गेट विमाने असल्याने एफबीआयच्या तज्ज्ञांनी अनेक प्रकारच्या लॅपटॉप बॉम्बचे परिक्षण केले आहे. विमानतळावरील स्कॅनर्स मशीनद्वारे हे लॅपटॉप बॉम्ब डिटेक्ट होतात की नाही हे पाहण्यासाठीच एफबीआयने ही चाचणी केल्याचं सांगण्यात येते.

Related posts

काँग्रेस पक्ष हा केवळ तुमच्या किंवा राहुलजींच्या हातात सुरक्षित आहे, राजीव सातव यांचे सोनिया गांधींना पत्र

News Desk

नागालँडमध्ये भाजप आणि एनडीपीपी युतीचा विजय

News Desk

केंद्रात भाजपला जबरदस्त धक्का, शिरोमणी अकाली दलचा NDAतून काढता पाय

News Desk