HW News Marathi
देश / विदेश

टीम इंडियाच्या एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदी विराट कोहली

  • धोनीच्या राजीनाम्यानंतर एकदिवसीय संघाचीही जबाबदारी कोहलीवर

अक्षय घुगे – 7208424304

मुंबई – भारतीय संघाच्या एकदिवसीय, टी ट्वेंटी आणि कसोटी संघाची पूर्णपणे जबाबदारी ही विराट कोहलीवर सोपवण्यात आली आहे. महेंद्रसिंह धोनीने एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर विराटकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.

इंग्लंडविरूद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी शुक्रवारी भारतीय संघाची निवड करण्यात आली. महेंद्रसिंह धोनीने तडकाफडकी कर्णधारपदाचा राजीनामा दिल्याने ही धूरा कोणाकडे दिली जाते याची उत्सुकता होती, तसाच विराटकडे ही संधी जाईल अशी शक्यताही वर्तवण्यात येत होती. अपेक्षेप्रमाणे शुक्रवारी निवड समितीने कोहलीकडे कर्णधारपद दिले. याशिवाय स्थानिक पातळीवर चमकदार कामगिरी करणा-या युवराज सिंगलाही भारतीय संघात स्थान मिळाले आहे. सुरेश रैना आणि आशिष नेहराला टी ट्वेंटी संघात संधी मिळाली आहे.

वन डे मालिकेसाठी भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, के एल राहुल, महेंद्रसिंह धोनी, मनिष पांडे, केदार जाधव, युवराज सिंग, अजिंक्य रहाणे, हार्दिक पंड्या, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अमित मिश्रा, जसप्रित बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि उमेश यादव

टी – 20 मालिकेसाठी भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), महेंद्रसिंह धोनी, मनदीप सिंह, के एल राहुल, युवराज सिंग, सुरेश रैना, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, आर अश्विन, रविंद्र जडेजा, युजवेंद्र चहल, मनिष पांडे, जसप्रित बुमराह, भुवनेश्वर कुमार, आशिष नेहरा

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सरकारी बँकांचे खासगीकरण होणार, पंतप्रधानांचे संकेत

News Desk

सुखोई आणि मिराज लढाऊ विमान मध्य प्रदेशमध्ये कोसळले; 2 वैमानिक सुरक्षित तर 1 गंभीर जखमी

Aprna

कुलभूषण जाधव दोषी, कायदेशीर लढाई सुरुच ठेवणार !

News Desk