HW News Marathi
देश / विदेश

लाडक्या धोनीला राजकीय नेत्यांनी देखील दिल्या निवृत्तीच्या शुभेच्छा!

मुंबई | भारताचा क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने काल (१५ ऑगस्ट) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर त्याच्या चाहत्यांनी दुःख तर व्यक्त केलेच मात्र त्याची क्रिकेटची कारकीर्द जी त्याने घडवली त्याला सलाम देखील केला. धोनीच्या याच कामगिरीला अनेक राजकीय नेत्यांनी देखील उजाळा दिला आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही धोनी सोबतचा त्यांचा फोटो ट्विट करत क्रिकेटमध्ये धोनीने केलेली कामगिरी ही अद्वितीय आहे असे म्हटले आहे.

तसेच,राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही धोनीच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर महेंद्रसिंगने जगाला आपल्या खेळातून एक संदेश दिल्याचे म्हटले आहे. धोनीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट जगातातील प्रवास म्हणजे नथिंग इज इम्पॉसिबल असल्याचं सुप्रिया यांनी सूचवलं आहे.

त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते पार्थ पवार यांनीही ट्विट करत धोनीला शुभेच्छा दिल्या आहेत. क्रिकेट या खेळाला तू एका उंच ठिकाणी नेऊन ठेवले अशा आशयाचे त्यांनी ट्विट देखील केले आहे.

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील धोनीला त्याच्या खेळातील उत्तम कामगिरीला शुभेच्छा दिल्या आहेत.

“जगप्रसिद्ध क्रिकेटपट्टू महेंद्रसिंह धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, धोनी तुझे योगदान सर्वांच्या लक्षात राहील !भारतीय संघाचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार म्हणून धोनीचे नाव कायम घेतले जाईल”, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कुमार मंगलम बिर्ला, सुमन कल्याणपूर यांना पद्म भूषण तर ४ मान्यवर पद्मश्री पुरस्काराने सन्मानित

Aprna

मोदींवर टीका करणाऱ्या पत्रकाराला ‘आजतक’ने केलं ​निलंबित!

News Desk

#CoronaVirus : आज मध्यरात्रीपासून २१ दिवसांसाठी संपूर्ण भारत लॉकडाऊन, पंतप्रधानांची घोषणा

swarit