HW News Marathi
देश / विदेश

शरद यादवचा आरजेडीला पाठिंबा-लालू

पाटणा(वृत्तसंस्था): बिहारच्या राजकारणात महागंठबंधन तोडून भाजपसोबत घरोबा करून सत्तास्थापन केल्यामुळे जेडयुचे नेते शरद यादव नाराज आहेत. संपूर्ण घडामोडीवर शरद यावर यांनी काहीही भाष्य केलेले नाही, आरजेडीचे नेते लालूप्रसाद यादव यांनी मात्र, शरद यादव यांचा मला पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. नितीशकुमार यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर शरद यादव यांचा मला फोन आला. मी तुमच्यासोबत आहे, असे त्यांनी मला फोनवरून सांगितल्याचा दावा लालूप्रसाद यांनी केला.

नितीशकुमार यांनी एनडीएसोबत जाण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर त्यांच्यात पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद यादव नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यांच्या नाराजीबाबत येथील राजकीय वतुर्ळात वेगवेगळे तर्क लढवले जात आहेत. तसेच यादव गेल्या काही महिन्यांपासून संसदेतही फारसे कुणाशी बोलत नसल्याचे सांगण्यात येत आहे. नितीशकुमार यांनी महाआघाडीची फारकत घेत एनडीएसोबत जाण्याचा निर्णय घेतला त्या दिवशी शरद यादव एका कार्यक्रमासाठी आले होते. नितीशकुमार यांनी निर्णय जाहीर केल्यानंतर ते लगेच तेथून निघून गेले होते.

दरम्यान, नितीशकुमार यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. काल विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. आज संध्याकाळी मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. अद्याप याबाबत त्यांनी घोषणा केली नसली तरी पाटणामध्ये नितीशकुमारांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत आज संध्याकाळी मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याबाबत संकेत दिले आहेत. या बैठकीत मंत्र्यांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे, अशी माहितीही सूत्रांकडून देण्यात आली

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गुजरात विधानसभेत राडा, काँग्रेस आमदारानं भाजप आमदाराला पट्ट्यानं मारहान

News Desk

मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वातील संसदेचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन १७ जून ते २६ जुलैदरम्यान

News Desk

तेलंगणा विधानसभेच्या मतदानाला सुरुवात

News Desk