HW News Marathi
देश / विदेश

आमदार आणि सनदी अधिकाऱ्याची लव्ह स्टोरी   

तिरुअनंतपूरम – काँग्रेसचे आमदार के एस सबरीनाथन आणि तिरुअनंतपूरमच्या उपजिल्हाधिकारी दिव्या एस अय्यर (आयएएस) यांचे सूत जूळले असून दोघेही लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. या बातमीला दोघांनीही दुजोरा दिला आहे. त्यांची ही अनोखी लव्ह स्टोरी लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.

दोघांच्या प्रेमसंबंधावर सुरु असलेल्या चर्चेवर सबरीनाथन यांनीच पुर्णविराम लावला. सबरीनाथन यांनी फेसबूकवर आपलं रिलेशनशिप स्टेटस कमिटेड असं बदललं आणि सर्वांना आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. सबरीनाथन यांनी दिव्या यांच्यासोबत आपला फोटो पोस्ट करत लिहिलं आहे की, ‘गेल्या काही दिवसांपासून माझ्या जवळचे लोक लग्नासंबंधी चर्चा करत आहेत. आता मला ही घोषणा करताना आनंद होत आहे. माझी उपजिल्हाधिकारी डॉ दिव्या एस अय्यरशी तिरुपअनंतपूरममध्ये भेट झाली होती. त्यानंतर आमच्यामधील जवळीक वाढली, आम्ही एकमेकांना समजून घेतलं. दोन्ही कुटुंबाच्या आशिर्वादाने दिव्या माझी सहचारिणी होणार आहे. आम्ही तुमच्या सर्वांच्या आशिर्वादाची अपेक्षा करतो’. तर दुसरीकडे लग्नाची बातमी मिळाल्यापासून उत्साहित झालेल्या दिव्या यांनी सांगितलं आहे की, ‘एखाद्या सनदी अधिका-याने राजकारण्याशी लग्न केल्याचं माझ्या पाहण्यात नाही. आम्हाला तुमच्या आशिर्वादाची गरज आहे’. पुढील महिन्यात दोघांचा विवाहसोहळा पार पडणार आहे. आमदार सबरीनाथन आणि सनदी अधिकारी दिव्या यांच्या लग्नाच्या बातमीचा विषय सध्या केरळमध्ये सर्वत्र चर्चेचा विषय ठरतोय.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजनाथ सिंह यांचा चीनला इशारा, राफेलचा समावेश हा सार्वभौमत्वावर नजर ठेवणाऱ्यांसाठी एक संदेश!

News Desk

सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश पिनाकी चंद्र घोष ठरणार देशाचे पहिले लोकपाल ?

News Desk

बजेटमध्ये पेट्रोल-डिझेल स्वस्त तर हे महाग

News Desk