HW News Marathi
देश / विदेश

कडू आणि कोसम्बींना साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली – भारतीय साहित्य क्षेत्रातला अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या साहित्य अकादमीच्या पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली. यामध्ये ल.म. कडू आणि राहुल कोसम्बी या दोन मराठी साहित्यिकांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत.

साहित्यिक ल.म. कडू यांना २०१७ चा बाल साहित्य पुरस्कार तर राहुल कोसम्बी यांना युवा साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. साहित्यिक ल.म. कडू यांच्या ‘खारीच्या वाटा’ या कादंबरीसाठी हा पुरस्कार झाहीर झाला आहे. तर राहुल कोसम्बी यांच्या ‘उभं आडवं’ या पुस्तकाला २०१७ चा युवा साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचं मराठी साहित्य विश्वात स्वागत कऱण्यात आलंय.

साहित्य अकादमीची गुरुवारी बैठक झाली. अकादमीचे अध्यक्ष विश्वनाथ तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली गुवाहाटीमध्ये अकादमीच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत पुरस्कारप्राप्त लेखकांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. २४ भाषांमधील लेखकांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. मराठी भाषेत राहुल कोसंबी यांना ‘उभं-आडवं’ या कथासंग्रहासाठी अकादमीचा युवा पुरस्कार जाहीर करण्यात आला. तर कोकणी भाषेत ‘मोग डॉट कॉम’ या कवितासंग्रहासाठी अमेय विश्राम नायक यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. हिंदीमध्ये तारो सिदिक आणि उर्दूमध्ये रशीद अशरफ खान यांची युवा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. बहुमताच्या आधारे या साहित्यिकांची निवड करण्यात आल्याचे अकादमीने म्हटले आहे. ३५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या साहित्यिकांची साहित्य अकादमीच्या युवा पुरस्कारासाठी निवड केली जाते. ५० हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रेल्वे करणार २ लाख कामगार भरती

News Desk

बीडमध्ये मुंडे बहीण-भावात पुन्हा लागली श्रेय वादावर चढाओढ

News Desk

“राज्याला उद्योग-प्रकल्प आणि गुंतवणुकीत सहकार्य करावे”, मुख्यमंत्र्यांचा पंतप्रधानांना फोन

Aprna