HW News Marathi
क्राइम

छत्तीसगढमध्ये नक्षलवाद्यांनी पेटवली प्रवासी बस

रायपूर | छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी एक प्रवासी बस पेटविल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून ३ नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे. बुधवारी (१६ जानेवारी) सकाळी गीदमहून छींदनारकडे जाणारी प्रवासी बस कासुल गावाजवळ पोहोचताच नक्षलवाद्यांनी शस्त्रांचा धाक दाखवत बस थांबवत १४ प्रवाशांसह चालकाला बसमधून खाली उतरण्यास सांगितले. यावेळी प्रवासी आणि चालकाला मारहाण करून त्यांचे फोन हिसकावून घेत नक्षलवाद्यांनी ही बस पेटवून दिल्याची माहिती दंतेवाडा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अभिषेक पल्लव यांनी दिली आहे.

नक्षलवाद्यांकडून हिसकावण्यात आलेल्या मोबाईल्सच्या मदतीने पोलिसांनी या नक्षलवाद्यांचा पाठलाग केला. यावेळी पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत काही नक्षलवादी जखमी झाले असून तर ३ नक्षलवाद्यांना अटक करण्यास पोलिसांना यश आले आहे. यावेळी नक्षलवाद्यांकडील शस्त्रसाठा देखील जप्त करण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गौरी लंकेश हत्येप्रकरणी बेळगावमधून आणखी एक जण ताब्यात

Gauri Tilekar

चेष्टा जीवावर बेतली, रागात कु-हाडीने एकाची हत्या

News Desk

पाकिस्तानकडून गोळीबार बीएसएफचा एक जवान शहीद

swarit