HW News Marathi
देश / विदेश

ताशी ३१० किमी वेगाने धावणाऱ्या रेल्वेची चाचणी यशस्वी

वॉशिंग्टन – तंत्रज्ञानाच्या बाबत जगाच्या दोन पावले पुढे असणाऱ्या अमेरिकेत आता सुपरसोनिक रेल्वेची यशस्वी चाचणी केली आहे. हायपरलूप म्हणजे सुपरसॉनिक स्पीडने धावणारी रेल्वे. अशा प्रकारची रेल्वे तयार करण्याच्या मार्गातील एक एक महत्वाचा टप्पा पार केल्याचे हायपरलूप वनकडून बुधवारी सांगण्यात आले.

मागच्या आठवडयात लास वेगासमध्ये खासगी जागेत संपूर्ण हायपूरलूप सिस्टिमची यशस्वी चाचणी घेण्यात आली. यावेळी वेगाचा नवीन उच्चांक नोंदला गेला असे हायपरलूप वनकडून सांगण्यात आले. ही चाचणी यशस्वी होणे ही आमच्यासाठी एक मोठी बाब आहे असे हायपरलूप वनचे सहसंस्थापक शेरवीन पीसहीवर यांनी सांगितले. या चाचणीतून हायपरलूप तंत्रज्ञानाने प्रवासी वाहतूक शक्य असल्याचे आम्ही सिद्ध केले आहे. आता यापुढे ख-या अर्थाने हायपरलूप टेक्नॉलॉजीवर व्यावसायिक अंगाने काम सुरु होईल असे शेरवीन यांनी सांगितले.

हायपरलूप ट्रेन ही चुंबकीय शक्तीवर आधारीत टेक्निक आहे. हा भुयारी वाहतूक प्रकल्प आहे. निर्वात भुयारी पोकळीतून पॉड किंवा टयुबमधून प्रवासी आणि मालवाहतूकीची योजना आहे. हायपरलूप ट्रेनने चाचणीच्यावेळी ताशी 310 किलोमीटर वेग गाठला. हे तंत्रज्ञान यशस्वी ठरु शकते हे आम्ही सिद्ध केले. आता हा प्रकल्प प्रत्यक्षात साकारण्यासाठी त्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी विविध देशातील सरकारे, उद्योजक यांच्याशी चर्चा सुरु करणार आहोत असे मुख्य अधिकारी रॉब लॉईड यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Independence Day | स्वातंत्र्य दिनानिमित्त गुगलचे खास डुडल

News Desk

अभिमानास्पद ! विदर्भाचा माणुस थेट स्कॅाटिश संसदेत झाला खासदार

News Desk

राज्यपाल-मुख्यमंत्र्यांच्या पत्रव्यवहार वादावर अमित शाह नाराज

News Desk