HW News Marathi
देश / विदेश

दुबईतील ७४ मजली टॉवर पेटला

दुबई – येथील ७४ मजली टॉर्च टॉवरला शुक्रवारी पहाटे भीषण आग लागली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे अद्याप वृत्त नाही. आग लागल्यानंतर टॉवरमधील सर्व रहिवासीभराभर बाहेर पडले. त्यामुळे जीवितहानी टळली. अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस आग विझवण्याचे प्रयत्न आहेत. फेब्रुवारी २०१५ मध्येही या टॉवरला भीषण आग लागली होती.

टॉर्च टॉवर जगातील सर्वात उंच टॉवरपैकी एक असून तो ,१०५ फूट उंच आहे. दरम्यान, या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आम्ही झोपेत असताना आग लागल्याचा अलार्म वाजला. त्यामुळे खडबडून जागे होऊन बाहेर पडले. अगदी ५०व्या मजल्यावरून अवघ्या दहा मिनिटांतच आम्ही बाहेर पडलो, अशी माहिती जॉर्ज या रहिवाशाने दिली. तसेच वरच्या मजल्यांवर आग लागली. त्यानंतर टॉवरचा जळालेला काही भाग खाली कोसळला. त्यामुळं खालच्या मजल्यांवरही आग पसरली, असं १२ व्या मजल्यावरील रहिवासी मोहम्मद यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईत शरद पवारांच्या उपस्थित होणार शेतकरी आंदोलन !

News Desk

मानव तस्करी प्रकरणी गायक दलेर मेहंदीला २ वर्षाची शिक्षा

News Desk

‘आप’च्या ३ खासदारांना सभापतींनी केले एकदिवसासाठी निलंबीत

News Desk