HW News Marathi
देश / विदेश

भाजप फिवर पोटनिवडणुकीतही कायम…

नवी दिल्ली – नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकातली भाजपची लाट आता आठ राज्यातल्या विधानसभा पोटनिवडणुकीतही कायम राहिल्याचं दिसतंय. उत्तर प्रदेश, उत्तराखंडपाठोपाठ आता आठ राज्यांमधील १० जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीतही भाजपचीच लाट कायम असल्याचे दिसून येत आहे. दिल्ली, हिमाचलप्रदेश, आसाम आणि मध्यप्रदेशमधील एका जागेवर भाजपचा विजय झाला आहे. दिल्लीत आम आदमी पक्षाचा पराभव हा अरविंद केजरीवाल यांच्यासाठी हादरा असल्याचे मानले जाते.

आठ राज्यांमधील विधानसभेच्या १० जागांसाठी मतदान झाले होते. गुरुवारी सकाळी आठ वाजता या निवडणुकीतील मतमोजणी सुरुवात झाली. दिल्लीतील राजौरी गार्डनमधील जागा आपचे आमदार जनरैल सिंह यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झाली होती. दिल्ली महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने आपसाठी ही निवडणूक महत्त्वाची होती. पण यात आप उमेदवाराचा पराभव झाला.

मध्यप्रदेशमधील अटेर ही जागा काँग्रेस नेते सत्यदेव कटारे यांच्या निधनानंतर रिक्त झाली होती. या निवडणुकीत काँग्रेसने कटारे यांचे चिरंजीव हेमंत कटारे यांना रिंगणात उतरवले आहे. तर याच राज्यातील बांधवगढमधील जागा भाजप आमदार ज्ञानसिंह खासदार झाल्याने रिक्त झाली आहे. या दोन्ही जागा कायम राखण्याचे आव्हान भाजप आणि काँग्रेससमोर आहे. राजस्थानमधील धौलपूरमध्येही पोटनिवडणूक झाली असून बसप आमदाराला तुरुंगवास झाल्याने ही जागा रिक्त झाली होती.

कर्नाटकमधील नंजनगूडमध्येही पोटनिवडणूक झाली. काँग्रेस आमदार व्ही.श्रीनिवास प्रसाद भाजपमध्ये आल्याने ही जागा रिक्त होती. प्रसाद यांचा पराभव करण्यासाठी काँग्रेसने प्रतिष्ठापणाला लावली आहे. याशिवाय याच राज्यातील गुंदलूपेट विधानसभा क्षेत्रासाठी मतमोजणी होईल. काँग्रेस आमदार महादेव प्रसाद यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. पश्चिम बंगालमधील कांथी दक्षिण या मतदारसंघात तृणमूल काँग्रेसचे आमदार दिव्येंदू अधिकारी खासदार झाल्याने ही जागा रिक्त झाली होती. झारखंडमधील लिटिपाडामध्येही निवडणुक झाली असून झारखंड मुक्ती मोर्चाचे अनिल मुर्मू यांच्या निधनाने ही जागा रिक्त झाली होती. आसाममधील घेमाजी आणि हिमाचल प्रदेशमधील भोरंजसाठीही आज मतमोजणी होणार आहे.

पोटनिवडणूक झालेल्या १० पैकी तीन जागा काँग्रेसकडे तर तीन जागा भाजपकडे होत्या. तूर्तास राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजप काँग्रेसपेक्षा काही हजार मतांनीच पिछाडीवर आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीत बाजी मारुन राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत आघाडी घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कर्नाटकाच्या आमदारांची सर्वोच्च न्यायालयात धाव

News Desk

अखेर मोदी सरकारने जिंकला विश्वास

News Desk

शरद पवार, सोनिया गांधी, उद्धव ठाकरेंनी ३५,००० कोटींकडे वेधलं केंद्राचं लक्ष

News Desk