HW News Marathi
देश / विदेश

शशिकलांना जेलमध्ये पाच रूम, टीव्ही संच

बेंगळूरू(वृत्तसंस्था) येथील कारागृहात शिक्षा भोगत असलेली एआयएमडीकेच्या नेत्या शशिकला यांना जेलमध्ये विशेष सोयी-सुविधा पुरविल्या जात असल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. जेलमध्ये त्यांच्यासाठी चार ते पाच खोल्या खाली ठेवण्यात आल्या असून त्यांच्यासाठी प्रत्येक रुममध्ये विशेष सोयी आहे. एका रूममध्ये मोठा स्क्रिनचा टीव्ही संच बसवण्यात आला आहे. तर त्यांच्यासाठी खास किचन बनवण्यात आले आहे. यासाठी त्यांनी जेल अधिका-यांना दोन कोटी रुपयांची लाच दिल्याची माहिती डी. रुपा या महिला अधिका-यांनी नुकतीच उघडकीस आणली होती. त्यानंतर त्यांची सरकारने तडकाफडकी इतरत्र बदली केली. दरम्यान, यानंतर शशिकला यांना प्रत्यक्षात जेलमध्ये काय, काय सुविधा पुरवल्या जात आहेत, याचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. त्यात त्यांच्यासाठी सरकारने पायघड्या टाकल्याचे दिसत आहे. त्या आपल्या राजमहालामध्ये असल्याप्रमाणे मुक्त संचार करत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मविआ सरकारने एक उमेदवार मागे घ्यावा, मग घोडेबाजाराचा प्रश्नच उरत नाही,” फडणवीसांची प्रतिक्रिया

Aprna

पाकिस्तानमध्ये आजही जीवंत आहे भगतसिंग 

News Desk

Ayodhya Verdict : सर्वोच्च न्यायालयात आज ५ सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी

News Desk