HW News Marathi
देश / विदेश

1 मे पासून अधिका-यांची लालबत्ती गुल

 

नवी दिल्ली – येत्या 1 मे पासून सर्व मंत्री आणि अधिका-यांच्या वाहनांवरील लालदिवे बंद करण्याचा महत्वाचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे आता मंत्री व प्रशासकीय अधिका-यांच्या वाहनांवर असलेला लाल दिवा जाणार आहे. 1 मे पासून या नियमाची अंमलबजावणी होणार आहे .

आज (बुधवार) झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे केंद्रासह इतर राज्यातही हा नियम लवकरच लागू होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनीदेखील काही दिवसांपूर्वी वाहनांवरील लाल दिवा काढण्याचे आदेश दिले होते. त्यापाठोपाठ आता केंद्रानेही हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे अनेक मंत्री, प्रशासकीय अधिका-यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सरकारने मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देण्याच्या जबाबदारीतून पळ काढू नये !

News Desk

५ एकर जमिनीची भीक नको | असदुद्दीन ओवेसी

News Desk

‘शाहीन बाग खेल खत्म’, म्हणत ‘त्या’ तरुणाने आंदोलकांवर केला गोळीबार

swarit