HW News Marathi
देश / विदेश

१०८ रुग्णवाहिकेची सेवा आजपासून बंद

मुंबई | आजपासून रुग्णवाहिकेची सेवा कोलमडण्याची शक्यता आहे. भारत विकास ग्रुपतर्फे (बीव्हीजी) चालवण्यात येणाऱ्या १०८ या रुग्णवाहिका सेवेतील चालक व डॉक्टर विविध मागण्यांसाठी संपावर जाणार आहेत. बाराऐवजी आठ तास काम, वेतनवाढ व वेतन करार, पीएफ, ईएसआयसी व सार्वजनिक सुट्या मिळाव्यात, अपघाती विमा व कौटुंबिक विमा मिळावा, कंपनीतील अधिकाऱ्यांकडून ड्रायव्हर व डॉक्टरांची होणारी पिळवणूक थांबवण्यात यावी, अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.

यामुळे महाराष्ट्रातील कित्येक रूग्णांना व अचानक ओढवणाऱ्या घटणेमुळे जखमी होणाऱ्या लोकांना मोठ्या संकटाला समोर जावं लागणार आहे. हे कामगार आपल्या मागण्यांसाठी भारत विकास या ग्रुपचा पिळवणुकीला कंटाळून हे बेमुदत आंदोलन करणार आहेत. वेळोवेळी या कामगार अससोसिएशनने भारत विकास ग्रुपशी ( बी व्ही जी) आस्थापना व संबंधित शासकीय यंत्रनेशी पत्रव्यवहार केला असताना ही त्यांचा मागण्या मान्य झाल्या नाही. त्यामुळे आज महाराष्ट्र भर आपल्या संघटनेद्वारे आंदोलन करणार आहेत.

त्यांच्या कंपनीकडे असलेल्या मागण्या

१) १२ तासांऐवजी ८ तास काम

२) वेतन वाढ व वेतन करार

3) डॉक्टर याना कायमस्वरूपी सेवेत रुजू करणे

४) पी.एफ. ई.एस. आय सी सार्वजनिक सुट्या मिळाव्यात यासाठी

५) अपघाती व कुटुंबिक विमा मिळाला पाहिजे

६) कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ड्रायवर व डॉक्टरांची मानसिक आणि शारीरिक पिळवणूक थांबवावी (उदा:धमकी,मारहाण)

आज या बंदमध्ये २४०० ड्रायव्हर व ३६०० डॉक्टर सहभागी होतील होणार आहेत पण जे गंभीर रुग्ण असतील त्यांना आम्ही सेवा देऊ अशी माहिती संघटनेतील सदस्यांनी दिली आहे. हा बंद आम्ही कामगारांनी पिळवणुकीला कंटाळून व काही हक्काचा मागण्यांसाठी आहे. रुग्णांना वाचवण्यासाठी आम्ही कर्मचारी व डॉक्टर जीवाची पर्वा न करता मेहनत करतो पण कंपनीच आम्हाला कर्मचाऱ्यांना वेन्टिलेटरवर टाकत आहे त्यामुळे आम्ही हा बेमुदत बंद केला आहे, असे युनियन सदस्य समीर करबेले यांनी सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राम मंदिर उभारण्यासाठी मुस्लिमांचा हातभार

swarit

देवेंद्र फडणवीसांना पक्षाकडून मोठी जबाबदारी ! केंद्रीय नेतृत्त्व लवकरच करणार घोषणा

News Desk

अखेर ‘जैश’चा म्होरक्या मसूद अजहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित

News Desk