HW News Marathi
देश / विदेश

अमेरिकेत शाळेत गोळीबार 17 ठार

साऊथ फ्लोरिडाच्या डगलस हायस्कूलमध्ये एका माजी विद्यार्थ्याने अंदाधुंद गोळीबार करून 17 जणांचा जीव घेतला. मृतांमध्ये विद्यार्थ्यांचा समावेश आहे. निकोलस क्रूज या माजी विद्यार्थ्याने हे कृत्य केल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. दरम्यान, या घटनेत अनेकजण जखमी झाले आहेत. आरोपी विद्यार्थ्याला शिस्तभंग केल्यामुळे शाळेतून काढून टाकण्यात आले होते. त्याचा राग आल्याने त्याने हे कृत्य केल्याचे बोलले जात आहे. क्रूजने आधी शाळेबाहेर फायरिंग केले. त्यात तिघांचा मृत्यू झाला. त्यानंतर तो इमारतीत घुसला आणि 12 जणांची हत्या केली. घटनेमध्ये ठार झालेल्या 12 जणांचा मृत्यू शाळेत तर दोघांचा इमारतीबाहेर झाला. एका व्यक्तीने रस्त्यावर तर दोन जखमींनी रुग्णालयात प्राण गमावले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पी. चिदंबरम यांची सीबीआय चौकशी

News Desk

अटलजींना आहेत हे आजार…

News Desk

डोवाल यांनी काश्मीरमधील नागरिकांसोबत जेवण करत केली चर्चा

News Desk