HW News Marathi
देश / विदेश

#NirbhayaCase : नव्याने डेथ वॉरंट जारी, दोषींना ३ मार्चला सकाळी ६ वाजता फाशी

नवी दिल्ली | निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही दोषींना एकाच वेळी फाशी देण्यात येणार आहे. या चारही दोषींना ३ मार्चला सकाळी ६ वाजात फाशी देण्याचा निर्णय पटियाला हाऊस न्यायालयाकडून देण्यात आला आहे. न्यायलायकडून तिसऱ्यांदा निर्भयाच्या दोषींना फाशी जाहीर करण्यात आली आहे. चारही दोषींना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर न्यायालयाकडून डेथ वॉरंट जारी करण्यात आले आहे.

अक्षय ठाकूर (३१), पवन गुप्ता (२५), मुकेश सिंह (३२) आणि विनय शर्मा (२६) निर्भयाच्या चार दोषींची नावे आहेत. निर्भयाच्या आई-वडिलांनी दोषींविरोधात मंगळवारी (११ फेब्रुवारी) डेथ वॉरंट याचिका दाखल केली होती. यापूर्वी पटियाला हाऊस न्यायालयानं डेथ वॉरंटमध्ये २२ जानेवारी रोजी दोषींना फासावर लटकावण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पुन्हा एकदा शनिवारी (१ फेब्रुवारी) फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी केली जाणार होती. परंतु, न्यायालयाने शुक्रवारी (३१ जानेवारी) एका याचिकेवर सुनावणी करताना या शिक्षेची अंमलबजावणी थांबवली होती.

१६ डिसेंबरची ‘ती ‘ काळरात्र

१६ डिसेंबर २०१२च्या रात्री पॅरामेडिकलची विद्यार्थीनी निर्भया आणि तिचा मित्र दिल्लीतील एका मॉलमधून सिनेमा पाहून घरी परतत होते. मित्रासोबत खासगी बसमधून मुनिरकाहून द्वारकाला जात होती. बसमध्ये त्या दोघांशिवाय सहा जण होते. त्या बसमध्ये आधीपासूनच चालकासह सहा जण होते. बस सुरू झाल्यावर त्या सहा जणांनी निर्भयाोसबत छेडछाड करायला सुरुवात केली. त्यावेळी तिच्या मित्राने त्यांना विरोध केला. मात्र, आरोपींनी मित्राला बेदम मारहाण केली. त्यामुळे तो बेशुद्ध झाला. त्यानंतर या सहा जणांनी निर्भयावर बसमध्येच बलात्कार केला. त्यावेळी त्यांनी तिला अत्यंत निर्घृणपणे मारहाणही केली होती. त्यामुळे निर्भया गंभीररित्या जखमी झाली होती. यानंतर आरोपींनी निर्भयाला रस्त्याकडेला फेकून दिले होते. या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. जखमी निर्भयावर आधी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर तिला सिंगापूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले. सिंगापूरमध्ये उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मध्य प्रदेशातील ‘उलट्या वराती’त नाचणाऱ्या भाजपच्या ‘वऱ्हाडी’ मंडळींनी लक्षात ठेवलेले बरे!

swarit

सुषमा स्वराज खोटारड्या आहेत, चीनचा आरोप

News Desk

अरविंद केजरीवाल आज तिसऱ्यांदा घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ

swarit