HW News Marathi
देश / विदेश

वेलकम फायटर ! ५ राफेल विमानांचे भारताच्या भूमीवर हॅपी लॅंडींग

अंबाला | फ्रान्स येथून भारताकडे रवाना झालेले ५ राफेल भारताच्या हवाई दलात दाखल झाले आहे. ही राफेलचे पहिली तुकडी असणार आहे. अंबाला एअरबेसवर भारताची ही ताकदवर राफेल दाखल झाली आहेत. राफेलमुळे भारताचे लष्करी सामर्थ्य बलवान होणार आहे. भारतीय नौदलाकडून राफेलच स्वागत करण्यात आले आहे. सगळ्यात पहिले राफेल शौर्यचक्र विजेते हरकिरत सिंग यांनी लॅंन्ड केले. वायुसेना प्रमख भदोरीया यांनी राफेलचे स्वागत केले. Su30 यांनी या राफेलला भारताच्या हद्दीत आल्यानंतर एक्सकोर्ट केले होते.भारतीय वायुसेनेसाठी हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. शत्रूच्या हद्दीत घुसून हे राफेल त्यांचा खात्मा करु शकणार आहेत.

भारताने सप्टेंबर २०१६ मध्ये फ्रान्ससोबत ३६ राफेल विमानांसाठी करार केला होता. हा करार जवळपास ५९००० कोटी रुपये इतका होता. या लढाऊ विमानांच्या करारानंतर आज पहिल्यांदा पाच राफेल भारतात पोहोचले आहेत. विशेष बाब म्हणजे भारतीय वैमानिकच या विमानाचे उड्डाण करुन ते भारतात आणले आहे.

पाच राफेल फायटर विमानांनी अंबालाच्या एअर फोर्स बेसवर लँडिंग केले होते. इथेच राफेलचा कायमस्वरुपी तळ असणार आहे. फ्रान्स मेरिनॅक एअर फोर्सच्या तळावरुन सोमवारी सकाळी या विमानांनी उड्डाण केले होते. संयुक्त अरब अमिरातीच्या अल धफ्रा बेसवर ही विमाने एकदिवस थांबली. त्यानंतर आज भारतात दाखल झाली. राफेलच्या पहिल्या तुकडीत तीन सिंगल सीटर आणि दोन डबल सीटर विमाने होती.

फ्रान्समध्ये प्रशिक्षित करण्यात आलेले भारतीय वैमानिक ही विमाने घेऊन भारतात आले. राफेल फायटर जेटच्या हाताळणीसाठी IAF चे बारा वैमानिक आणि इंजिनिअरींग क्रूला पूर्णपणे प्रशिक्षित करण्यात आले आहे. उड्डाणवस्थेत असतानाच या विमानांमध्ये इंधन भरण्यात आले. २० ऑगस्टला पारंपारिक पद्धतीने सोहळा आयोजित करुन या फायटर विमानांचा भारतीय हवाई दलात समावेश करण्यात येईल.

IAF च्या एअर क्रू आणि ग्राऊंड क्रू टीमला हे विमान कसे हाताळायचे, त्याबद्दल व्यापक असे प्रशिक्षण देण्यात आले आहे. भारताने फ्रान्सबरोबर २०१६ साली अशी ३६ राफेल विमाने खरेदी करण्याचा ५९ हजार कोटी रुपयांचा करार केला आहे. पूर्णपणे अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज विमाने फ्रान्सकडून भारताला देण्यात आली आहेत. लवकरात लवकर या विमानांचा वापर करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कर्तव्यपथावरील संचलनासाठी महाराष्ट्रातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या १४ विद्यार्थ्यांचा सराव

Aprna

कुंबळे-कोहली वाद मिटला, कुंबळेंनी दिला राजीनामा

News Desk

तेलंगणामध्ये पार पडला समलैंगिक जोडप्याचा विवाह सोहळा

Aprna