HW Marathi
देश / विदेश महाराष्ट्र

शरद पवार मुख्यमंत्र्यांना शिकवणार पूरपरिस्थिती नियोजन, २० तारखेला होणार भेट..!

राष्ट्रवादी कॉंग्रसचे अध्यक्ष शरद पवार हे २० ऑगस्टला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. ही भेट पूरपरिस्थिती बाबत असणार आहे. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूरपरिस्थितीबाबत ही भेट होणार आहे. या भेटीवेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कोल्हापूरचे राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

पूरग्रस्तांना मदत करण्यासंदर्भात तसेच पुनर्वसन करण्यासंदर्भात काही मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात येणार आहे. त्याचपद्धतीने पूरग्रस्तांचे पुनर्वसन कशा पद्धतीने करायचं, त्यात कोणकोणत्या गोष्टी अपेक्षित आहेत, याची माहिती या निवेदनात असेल.

महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पुराचा फटका बसला आहे. विशेषकरून पश्चिम महाराष्ट्रातील पूरस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. या भागातील महापुराचे पाणी ओसरले असले तरी आता लोकांच्या पुनर्वसनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. लोकांच्या घरांची पडझड झाली आहे, त्यांना पुन्हा नव्याने घर बांधून देण्याची जबाबदारी आता प्रशासनावर आहे.

या दरम्यान शरद पवार यांनी सातारा ,सांगली आणि कोल्हापूरमधील पूरग्रस्तांना भेटी दिल्या.किल्लारी भूकंपाच्या वेळी शरद पवार यांनी केलेलं काम त्यानंतर २००५ मध्ये सांगली मध्ये महापूर आला तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने केलेलं काम याचा त्यांना असलेला अनुभव यामुळे आता शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला महत्व आहे .

Related posts

भूपेन हजारीकांच्या कुटुंबीयांचा ‘भारतरत्न’ स्वीकारण्यास नकार

News Desk

राज्य मंत्रिमंडळातील ‘त्या’ नव्या १३ मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर

News Desk

कोफी अन्नान यांचे निधन

News Desk