Site icon HW News Marathi

ज्ञानवापी मशिदीमध्ये सापडलेल्या शिवलिंगाची ‘कार्बन डेटिंग’ करण्याची मागणी वाराणसी जिल्हा न्यायालयाने फेटाळली

मुंबई | ज्ञानवापी मशिदीमध्ये (Gyanvapi Masjid Case) सापडलेल्या शिवलिंगची ‘कार्बन डेटिंग’ (Carbon Dating) करण्याची मागणी जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावली. या शिवलिंगाची कार्बन डेटिंग करण्याची मागणी करणारी याचिका हिंदू पक्षाने केली होती. या शिवलिंगाची कार्बन डेटिंग केल्याने काही नुकसान झाले तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होईल, असे आज (14 ऑक्टोबर) वाराणसी जिलन्हा न्यायालयाने असे म्हणत याचिका फेटाळून लावली.

 

वाराणसी जिल्हा न्यायालयाने सुनावणीदरम्यान म्हटले, “ज्ञानवापी मशिदीमध्ये सापडलेले शिवलिंगाची जागा सुरक्षित ठेवण्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. दरम्यान, शिवलिंगाचे कार्बन डेटिंग केल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होईल,” असे म्हणाले.  यापूर्वी न्यायालयाने Places Of Workship Act 1991 दुर्लक्ष करत ज्ञानव्यापी प्रकरणाची सुनावणी योग्य मानले होते. या प्रकरणाची सुनावणी सुरू असतानाच हिंदू पक्षकारांनी कार्बन डेटिंग करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. परंतु, न्यायालयाने कार्बन डेटिंग करण्याची याचिका फेटाळून लावली.

 

पाच हिंदू महिलांनी श्रृंगार गौरी पूजेसाठी एक याचिका ऑगस्ट 2021मध्ये दाखल केली होती. या याचिकेत दिवाणी न्यायालयाने न्यायमुर्ती रवी कुमार दिवाकर यांनी न्यायालयात कमिश्नर नियुक्त करून ज्ञानव्यापी मशिदीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. या सर्वेक्षणादरम्यान मशिदीच्या परिसरात शिवलिंग आढळून आले. यानंतर मुस्लिम पक्षकारांनी न्यायालयात सांगतिले की, मशिदीत शिवलिंग नसून पाण्याचा कारंजेचे असल्याचा दाव केला होता. परंतु, हिंदू पक्षकारांनी न्यायालयाकडे हा भाग सील करण्याचे मागणी केली होती. यानंतर न्यायालयाने हिंदू पक्षकारांची मागणी मान्य करत शिंवलिंग आढळून आलेला भाग सील करण्याचे आदेश दिले. जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाविरोधात मुस्लिम पक्षकारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. पूजेच्या मागणीवरील याचिकेवर अद्याप निर्णय झालेला नाही.

 

 

Exit mobile version