Site icon HW News Marathi

‘आप’ने गुजरातमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी इसुदान गढवी यांच्या नावाची केली घोषणा

मुंबई | आम आदमी पार्टीने (Aam Aadmi Party) गुजरातमध्ये इसुदान गढवी (Isudan Gadhvi) यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून घोषित केला आहे. आपचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी आज (4 नोव्हेंबर) गुजरातमध्ये ‘आप’च्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार जाहीर केला. यापूर्वी केजरीवाल यांनी आपचा गुजरातच्या मुख्यमंत्री पदासाठी ‘कोण असेल.यासाठी ‘आपचा सीएम पदाचा उमेदवार’? या मोहिमेला  29 ऑक्टोबर रोजी सुरतमध्ये पत्रकार परिषद घेऊन राबविली होती.

आपने केलेल्या सर्व्हेनंतर इसुदान गढवी यांना 73 टक्के मते मिळाल्यानंतर मुख्यमंत्री पदाचा उमेदवार बनवले आहे. गढवी यांनी जूनमध्ये पत्रकारितेला रामराम करत राजकारणात प्रवेश केला. इसुदान गढवी हे गुजरातमधील इटालिया समाजातून येत आहेत. इसुदान गढवी हे गुजरातमध्ये शेतकरी नेता म्हणून त्यांना ओळखले जाते. गढवी यांचा जन्म 10 जानेवारी 1982 रोजी गुजरातमधील जामनगर जिल्ह्यातील पिपलिया गावमध्ये एका शेतकरी कुटुंबात झाला आहे. यानंतर गढवी यांनी महात्मा गांधी यांनी स्थापन केलेल्या अहमदाबादच्या गुजरात विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतले. यानंतर गढवींनी पत्रकारिते आपले करिअर केले.

 

Exit mobile version