HW News Marathi
देश / विदेश

अब्दुल कुरेशी या दहशतवाद्याला दिल्लीत अटक

नवी दिल्लीः सिमी तसेच इंडिजन मुजाहिदीनशी संबंधित अब्दुल सुभान कुरेशी या दहशतवाद्याच्या मुसक्या दिल्ली पोलिसांनी सोमवारी आवळल्या. तो अनेक दिवसांपासून फरार होता. दहशतवादी कारवायांमध्ये तो हवा होता. त्याच्यावर एनआयने चार लाखांचे बक्षित जाहीर केले होते. त्याच्या अटकेमुळे मोठा कट उघड होण्याची शक्यता आहे. त्याने पाकिस्तानमध्ये जाऊन दहशतवादाचे प्रशिक्षण घेतले होते. यानंतरच्या काळात तो सिमी आणि इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनांच्या संपर्कात होता. या काळात अब्दुल कुरेशी बॉम्ब तयार करण्याचा तज्ज्ञ म्हणून ओळखला जात होता. मुंबईचा रहिवाशी असणारा अब्दुल कुरेशी हा उच्चशिक्षित असून त्याने भारतातील अनेक बॉम्बस्फोटांमध्ये मास्टरमाईंड म्हणून भूमिका पार पाडली होती.

अब्दुल कुरेशी शनिवारी एका व्यक्तीला भेटायला दिल्लीतील राजापुरी परिसरात आला होता. त्यावेळी पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अब्दुल कुरेशीने त्याच्याजवळील पिस्तुलामधून पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. त्यानंतर काहीवेळ दोन्ही बाजूने गोळीबार सुरु होता. मात्र, पोलिसांनी अब्दुल कुरेशीला जिवंत पकडण्यात यश मिळवले. अब्दुल कुरेशीने भारताच्या अनेक भागांत दहशतवादाचे जाळे पसरले होते. याशिवाय, तो इंडियन मुजाहिदीनचा सर्वेसर्वा रियाज भटकळच्या जवळच्या वर्तुळातील होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ज्योतिरादित्य शिंदे यांचा काँग्रेसच्या सरचिटणीस पदाचा राजीनामा

News Desk

वर्षा अखेरीस पेट्रोल २० पैशांनी तर डिझेल २५ पैशांनी स्वस्त

News Desk

मजुरांच्या प्रश्नांबाबत केंद्राने दिले ‘हे’ स्पष्टीकरण

News Desk