HW News Marathi
देश / विदेश

झेलेन्स्कींनी युक्रेनमधून पलायन केल्याचा रशियन मीडियाचा दावा

नवी दिल्ली | रशिया-युक्रेनमध्ये गेल्या नऊ दिवसांपासून युद्ध सुरू आहे. आता रशियन मीडियानुसार युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी युक्रेन देश सोडून पळून गेल्याचा दावा केला आहे. झेलेन्स्की युक्रेनमधून पलायन करत पोलंडमध्ये पळून गेल्याचा दावा रशिय मिडीयाने केला आहे. 

 रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाले होते. तेव्हा देखील झेलेन्स्की देश सोडून गेल्याचा दावा रशियाने केला होती. परंतु, झेलेन्स्कींनी सोशल मीडियावर युक्रेनमध्ये असल्याचा व्हिडिओ पोस्ट केला होता. यानंतर झेलेन्स्की देश सोडून गेल्याच्या चर्चेला पूर्ण विराम लागला होता.

दरम्यान, रशियाने झेलेन्स्कींना तीन वेळा मारण्याचा दावा टाइम्स ऑफ लंडनने या वृत्तपत्रे केला होता. झेलेन्स्कींच्या हत्येच्या दाव्यानंतर जगभरात खळबळ माजली. रशियाने युक्रेन वर २४ फेब्रुवारीला हल्ला केला होता. तेव्हापासून रशिया-युक्रेन युद्ध सुरू आहे. या युद्धाला आज नऊ दिवस होऊन गेले असून देखील युक्रेनने रशियासमोर झुकला नाही. झेलेन्स्की हे स्व:ता युद्धात उतरले. झेलेन्स्की यांच्या रशिया पुढे न झुकण्याच्या भूमिकेमुळे आज ते जगभरात हिरो ठरले आहे. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारताची शांततेच्या मुद्यांवरून पहिल्यांदा तालिबानसोबत चर्चा

News Desk

पुलवामामध्ये पुन्हा सैन्याच्या वाहनाला लक्ष्य करत आयईडी स्फोट, ९ जवान जखमी

News Desk

Ayodhya Verdict : त्रिसदस्यीय समितीत तटस्थ व्यक्तीची नेमणूक करणे योग्य ठरले असते !

News Desk