Site icon HW News Marathi

“FPO मागे, भविष्यातील योजनांवर कोणताही परिणाम होणार नाही”, गौतम अदानींचे आश्वासन

मुंबई | अदानी एंटरप्रायजेसने एफपीओ मागे घेण्याची घोषणा केली आहे, ही माहिती अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी (Gautam Adani) यांनी व्हिडीओ जारी करत दिली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा अर्थसंकल्प संसदेत मांडला. यानंतर शेअर बाजारात अस्थिरता निर्माण झाल्यानंतर गौतम अदानी समूहाने 20 हजार कोटी रुपयाचा एफपीओ (FPO) मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, आमच्या भविष्यातील योजनांवर कोणताही परिणाम होणार नाही, असे आश्वासनही गौतम अदानींनी केले आहे.  गौतम अदानींचा व्हिडीओ अदानी समूहाच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून ट्वटी केला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी  हिंडेनबर्गचा संशोधन अहवाल आल्यानंतर अदानी समूह मोठे नुकसान झाले आहे. गौतम अदानींच्या निर्णयानंतर शेअर बाजारात चर्चेचा विषय झाले आहे.

व्हिडिओमध्ये गौतम अदानी म्हणाले, “मित्रांनो, कालच्या बाजारातील अस्थिरता लक्षात घेता. आमच्या बोर्डला या एफपीओ बरोबर पुढे जाणे नैतिकदृष्ट्या योग्य वाटले नाही. माझ्यासाठी माझ्या गुंतवणूकदाराचे हित जास्त महत्वाचे आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना संभाव्य तोट्यापासून वाचण्यासाठी आम्ही एफपीओ मागे घेतला आहे. या निर्णयाचा आमच्या ऑपरेशन्सवर. तसेच आमच्या भविष्यातील योजनांवर कोणताही परिणाम होणार नाही.”

अदानी श्रीमंताच्या यादीतून 15 व्या क्रमांकावर

हिंडेनबर्गच्या अहवालापूर्वी गौतम अदानी हे श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या स्थानी होते. परंतु, या अहवालानंतर गौतम अदानी थेट 15 व्या क्रमांकावर आले आहेत. त्याचबरोबर गौतम अदानी यांच्या संपत्तीमध्ये सुद्धा मोठी घसरण झाली आहे. आता अदानींची संपत्ती 72.7 अब्ज डॉलर्सवर आली आहे.

हिंडेनबर्ग रिसर्च अहवालात अदानी समूहावरील आरोप

हिंडेनबर्ग रिसर्चने अहवालात अदानी समुहामधील कंपन्यांच्या आर्थिक व्यवहारावर प्रश्नचिन्ह उभे केले आहेत. या अहवानानुसार, अदानी समूह हे मोठ्या कर्जाच्या दबावाखाली येऊ शकतात, असे अहवालात म्हणाले आहेत. त्याचबरोबर अदानी समूहाच्या शेअर दरात वाढ करण्यासाठी फेरफार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. अकाउंटिंग फ्रॉड आणि मॅनिप्युलेशन अदानी समूहाने केल्याचा दावा केला आहे. अदानी समूहामधील शेअर दर अधिक असून त्यांचे मूल्यांकनापेक्षा सुमारे 85 टक्के अधिक आहेत.

 

Exit mobile version