HW News Marathi
Covid-19

जाणून घ्या…सार्वजनिक ठिकाणी मास्क न घातल्याने दंड भरलेले ‘ते’ पंतप्रधान कोण?

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांना संबोधित केले. देशात अनलॉक १ सुरू झाल्यापासून नागरिकांचा निष्काळजीपणा आणि बेजबाबदारपणा चिंतेचा विषय ठरत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हटले. मात्र, कोरोनाचा सामना करताना आपल्याला काळजी घेणे आणि कोरोनाला रोखण्यासाठी नियामांचं पालन करण्याचीही आवश्यकता आहे, असे सांगितले. यावेळी मोदींनी भाषणात मोदी यांनी नाव न घेता एका देशाच्या पंतप्रधानांचा उल्लेख केला. सार्वजनिक ठिकाणी त्या पंतप्रधानांनी मास्क न घालता गेल्याने १३ हजार रुपये इतक्या रकमेचा दंड ठोठवण्यात आला, असा सांगितले.

दरम्यान, मोदींनी ज्या पंतप्रधानांनी मास्क न घातल्यामुळे दंड ठोठावला. ते नेमके कोणत्या देशाचे देशाचे आहेत, याची उत्सुकता अनेकांना लागून राहिली आहे, तर ते आहेत बल्गेरियन पंतप्रधान बॉयको बोरिस्कोव्ह. एका चर्चला दिलेल्या भेटीवेळी बॉयस्को बोरिस्कोव्ह यांनी मास्क घातला नव्हता. आपल्याच सरकारच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांना ३०० लेव्ह्ज (बल्गेरियन चलन) म्हणजे अंदाजे १३ हजार रुपये इतका दंड आकारण्यात आला. बुल्गारियामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत आरोग्य विभागाने नियम कडक केले आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे अनिवार्य आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना कोरोनाची लागण

News Desk

मी राज श्रीकांत ठाकरे ईश्वरसाक्ष शपथ घेतो की…, अमेय खोपकरांनी अशा दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

News Desk

भारतात कोरोनाचा उद्रेक! सलग तिसऱ्या दिवशी ४ लाखांहून अधिक रुग्ण

News Desk