Site icon HW News Marathi

अल कायदाचा प्रमुख अल-जवाहिरीला अमेरिकेने ड्रोन हल्ल्यात केला ठार; जो बायडनचा दुजोरा

मुंबई | अल कायदाचा (Al-Qaeda) प्रमुख अल-जवाहिरी (Ayman al-Zawahiri) याला अमेरिकेने ड्रोन हल्ल्यात ठार केला. अल-जवाहिरी हा 9/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड होता. अमेरिकेने अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये सीआएने केलेल्या ड्रोन हल्ल्यात अल-जवाहिरीचा खात्मा केला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अल-जवाहिरीच्या खात्म झालेल्या वृत्ताला दुजोरा दिला.

अमेरिकेने 2011 मध्ये ओसामा बिन लादेनचा खात्मा केल्यानंतर अल-जवाहिरीला अल कायदाचा प्रमुख बनविला होता. आता अल-जवाहिरीचा ठाकर केल्यानंतर अल आदेलचे नाव सैफ अल-आदेल, असे नाव असून आता अल आदेल हा अल कायदचा नवा प्रमुख झाला आहे. अमेरिकेने रविवारी 31 जुलै रोजी सकाळी ड्रोन हल्ला केला होता. अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात जवाहिरीचा खात्मा केला. जो बायडन म्हणाले, “शनिवारी माझ्या निर्देशानुसार युनायटेड स्टेट्सने अफगाणिस्तानाच्या काबुल येथे एयर स्ट्राइक करत अल कायदाचा प्रमुख अल-जवाहिरी याला ठार केले आहे. या हल्ल्यात कोणही जखमी न झाले नाही.”

अमेरिकेने जवाहिरीला मारण्यासाठी केलेल्या ड्रोन हल्ल्यात दोन क्षेपमास्त्रे डागली होती. अमेरिकेने जवाहिरीवर हल्ला करताना त्याचे कुटुंबिय देखील घटनास्थळी होते. या हल्ल्यात कोणालाही जखमी झाले नसून यात फक्त जवाहिरीच ठार गेले गेले. अल-जवाहिरी हे  ‘मोस्ट वॉन्टेड टेररिस्ट’ होता.

 

 

Exit mobile version