Site icon HW News Marathi

डॉ. उमर अहमद इलयासी यांनी मोहन भागवत यांचा ‘राष्ट्रपिता’ म्हणून उल्लेख

मुंबई | ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे डॉ. उमर अहमद इलयासी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांचा ‘राष्ट्रपिता’ आणि ‘राष्ट्रऋषी’ म्हणून माध्यमांशी बोलताना उल्लेख केला आहे. मोहन भागवतांनी आज (22 सप्टेंबर) दिल्लीमधील मशिदीला भेट दिली. या भेटीदरम्यान इलयासी आणि भागवतांमध्ये तब्बल एक ते दीड तास बंद दाराआड चर्चा झाली. यामुळे देशाच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

उमर अहमद इलयासी म्हणाले, “आज माझ्या निमंत्रणावरून मोहन भागवत यांनी भेट दिली. ते ‘राष्ट्रपिता’ आणि ‘राष्ट्रऋषी’ आहेत. भागवतांच्या भेटीतून एक चांगला संदेश जाईल. आपली देवपूजा करण्याच्या पद्धती भिन्न आहेत पण सर्वात मोठा धर्म हा मानवता आहे. आमचा विश्वास आहे की देश प्रथम येतो.”

याआधी भागवतांनी भागवतांनी माजी मुक्य निवडणूक आयुक्त एसवाय कुरैशी आणि दिल्लीचे माजी राज्यपाल नजीब जंग यांच्यासह मुस्लिम नेत्यांशी देखील चर्चा केली. अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचे माजी कुलगुरु लेफ्टनंट जनरल (सेवानिवृत्त) जमीरुद्दीन शाह, माजी खासदार शाहिद सिद्दीकी आणि परोपकारी सईद शेरवानी यांच्याशी दोन दिवसांपूर्वीच त्यांच्या कार्यलायत बैठकीत हजेरी लावली होती.

 

 

 

Exit mobile version