HW News Marathi
देश / विदेश

अरविंद केजरीवाल आज तिसऱ्यांदा घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ

नवी दिल्ली । दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालात आम आदमी पक्षाने ७० पैकी ६२ जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली आहे. तर भाजपला ८ जागा ताब्यात घेतल्या, तर दिल्लीवर २५ वर्ष सत्ता गाजवलेल्या काँग्रेसला निवडणुकीत एकही जागा जिंकता आलेली नाही. आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजन अरविंद केजरीवाल आज (१६ फेब्रुवारी) सलग तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. दिल्लीतील रामलीला मैदानावर हा शपथविधी होत आहे. या पार्श्वभूमीवर शपथविधी सोहळ्यासाठी रामलीला मैदान आणि परिसरात मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. केजरीवालांचा शपथविधी सोहळा दुपारी १२ वाजताच्या सुमारास सुरु होणार असल्याची माहिती सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिली.

‘दिल्लीकरांनो… तुमचा मुलगा तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत आहे. तुमच्या मुलाला आशीर्वाद देण्यासाठी जरूर या’ असे निमंत्रण अरविंद केजरीवाल यांनी सर्वसामान्य दिल्लीकरांना ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट करून केले आहे. ‘जेव्हा भारतमातेच्या प्रत्येक मुलाला चांगले शिक्षण मिळेल. भारताच्या प्रत्येक नागरिकाला चांगले उपचार मिळतील. सुरक्षा व सन्मान महिलांमध्ये आत्मसन्मान निर्माण करेल. युवकांना रोजगार मिळेल, शेतकऱ्यांनी त्यांच्या घामाचे मूल्य मिळेल. प्रत्येक भारतीयाला मुलभूत सुविधा मिळतील. धर्म, जात सोडून प्रत्येक भारतवासी भारताला पुढे घेऊन जाईल तेव्हाच अमर तिरंगा आकाशात अभिमानाने फडकेल. तुमचा मुलगा तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत आहे. त्याला आशीर्वाद देण्यासाठी रामलीला मैदानावर सकाळी सहा वाजेपर्यंत जरुर या’ असे निमंत्रण केजरीवालांनी व्हिडीओतून दिला आहे.

शपथविधीसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त

केजरीवालांच्या शपथविधी सोहळ्यासाठी दिल्ली पोलीस, सीआरपीएफसह निमलष्करी दलातील २,००० ते ३,००० जवान तैनात असतील. या दरम्यान ड्रोनच्या मदतीने सर्व कार्यक्रमावर नजर ठेवली जाईल, अशी माहिती सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिली. दिल्लीच्या जडणघडणीत हातभार लावणारे विविध क्षेत्रातील ५० जण केजरीवाल यांच्यासोबत मंचावर असतील. यामध्ये शिक्षक, बस मार्शल, सिग्नेचर ब्रिजचे आर्किटेक्ट आणि शहीद झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांच्या कुटुंबांचा समावेश आहे, अशी माहिती आपचे नेता मनिष सिसोदिया यांनी दिली.

केजरीवालांच्या शपथविधीसाठी मोदींना निमंत्रण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही केजरीवालांच्या शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रण पाठवण्यात आले आहे. आपने आधीच सांगितले होते की, मुख्यमंत्री किंवा इतर राज्यातील राजकीय नेते या कार्यक्रमात सहभाग घेणार नाहीत. कारण हा ‘दिल्लीकेंद्रित’ कार्यक्रम असेल.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदींच्या ‘मन की बात’ व्हिडिओला ४ लाखांपेक्षा जास्त डीसलाईक

News Desk

सीबीआयचे माजी संचालक अश्वनी कुमार यांची आत्महत्या

News Desk

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचा भारतीयांना मोठा दिलासा, दिली ‘ही’ चांगली बातमी

News Desk