HW News Marathi
क्राइम

म्हणून आता एटीएस पथक दिल्लीला जाणार….

मुंबई | देशात बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा अतिरेक्यांचा मोठा कट दिल्ली पोलिसांनी उधळून लावला आहे. दिल्ली पोलिसांनी पकडलेल्या अतिरेक्यांमध्ये एक मुंबईतील धारावी येथे राहणारा असल्याची माहिती दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने दिली आहे. या दहशतवाद्यांचा गर्दीच्या ठिकाणी आणि लोकलमध्ये स्फोट घडवण्याचा कट होता. यावरून एवढ्या मोठ्या कटाची माहिती महाराष्ट्र दहशवादविरोधी पथकाला (एटीएस) कसे माहीत नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यानंतर महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख विनीत अग्रवाल यांनी आपली भूमिका मांडली आहे.

एटीएस प्रमुक अग्रवाल यांनी माहिती देताना सांगितले की, जान मोहम्मद एकटाच दिल्लीला निघाला होता. त्याने ९ सप्टेंबरला जाण्याचे त्याने ठरवले होते. मात्र त्याला त्या तारखेचे तिकीट मिळाले नाही. त्याने १० तारखेला पैसे ट्रान्सफर केले. त्याचे तिकीट कन्फर्म होत नव्हते. त्यानंतर त्याने १३ सप्टेंबरचे वेटिंगचे तिकीट काढले आणि तो गोल्डन टेम्पल एक्सप्रेस ट्रेनने एस-६ या डब्यातून त्याने प्रवास सुरू केला. संध्याकाळपर्यंत त्याचे तिकीट कन्फर्म झाले.

दिल्ली पोलिसांनी सहा लोकांना अटक केली

अग्रवाल यांनी माहिती देताना सांगितले की, दिल्ली पोलिसांनी सहा लोकांना अटक केली आहे. त्यापैकी एक हा मुंबईतील धारावीचा असून त्याचे नाव जान मोहम्मद अली मोहम्मद शेख असे आहे. त्याचे पाकिस्तानातील डी कंपनीसोबत संबंध असल्याबद्दलची माहिती उपलब्ध आहे. हा रेकॉर्ड जवळपास २० वर्षांपूर्वीचा आहे. जान मोहम्मद अली मोहम्मद शेख हा आमच्या नजरेत होताच. पण त्याच्या दहशतवादी कटाबाबतची माहिती आमच्याकडे नव्हती. ती सेंट्रल एजन्सीकडे होती. त्यांच्याकडून ती माहिती दिल्ली पोलिसांना दिली गेली होती.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्तांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल

News Desk

झोमॅटोवर मिठाई खरेदी करणं पडल महागात; २ लाख ४० हजार ३१० रुपयांची ऑनलाईन फसवणूकीचा प्रकार समोर

Chetan Kirdat

१९९३ मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी अबू बकरला दुबईत अटक

News Desk