HW News Marathi
देश / विदेश

भारतीय सैन्याकडून पाक विरोधात मोठी कारवाई

जम्मू-कश्मीर | वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करणाऱ्या पाक विरोधात भारतीय सैन्याने मोठी कारवाई केली आहे. पुंछ जिल्ह्यातील मेंढर सेक्टरमध्ये असणाऱ्या पाकच्या चौक्या रॉकेट आणि तोफांचा मारा करून उद्धवस्त केल्या. या कारवाईत सैन्याने पाकच्या चौक्यांसह अनेक बंकर्सही उद्धवस्त केले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून सीमारेषेवर पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. त्यामुळे लष्करप्रमुखांकडून स्थानिक कमांडर्सना या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी पूर्णपणे मोकळीक देण्यात आली आहे. या भागातील राजौरी आणि मेंढर सेक्टरमधून दहशतवादी मोठ्याप्रमाणात घुसखोरी करतात.

या हल्ल्यात पाकच्या चौक्या आणि बंकर्स पूर्णपणे बेचिराख झाली आहेत. यात किती जीवितहानी झाल्याचे अद्याप कळू शकलेले नाही. भारतीय लष्कराने आतापर्यंत पाकच्या २० सैनिकांना ठार केले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात समान नागरी कायद्यांसाठी, हिंदू एकता संघटनेची मोदींकडे मागणी

News Desk

मनमोहनसिंग राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत राजस्थान मधून काँग्रेसचे उमेदवार

News Desk

जगात ‘या’ देशात फटाक्यांच्या आतिषबाजीत झाले नवीन वर्षाचे स्वागत

Aprna