Site icon HW News Marathi

गुजरात निवडणुकीसाठी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्र्यांकडे मोठी जबाबदारी

मुंबई | गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी (Gujarat Assembly Election ) भाजपने आपल्या 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली होती. यानंतर काँग्रेसने देखील त्यांच्या स्टार प्रचारांची यादी मंगळवारी (15 नोव्हेंबर) जाहीर केली आहे. काँग्रेसच्या यादीत महाराष्ट्रातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचा समावेश आहे. या यादीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांचे नाव नाही. यातीत थरूर यांचे नाव नसल्याने राजकीय वर्तुळता उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.

दरम्यान, काँग्रेसने त्यांच्या 40 स्टार प्रचारकांची यादीत महाराष्ट्रातून काँग्रेसच्या चार नेत्यांवर ही जबाबदारी सोपंवण्यात आली आली आहे. यात अशोक चव्हाण, शिवाजीराव मोघे, नसीम खान व रामकिशन ओझा यांचे ही नाव या यादीत आहे. गुजरात विधानसभा निवडणुका दोन टप्प्यात होणार आहेत. यात गुजरातमध्ये 1 आणि 5 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल 8 डिसेंबर रोजी येणार आहे.

 

काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची अशी आहे यादी

१). माजी अध्यक्ष सोनिया गांधी
२). काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे
३). काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी
४). काँग्रेस खासदार राहुल गांधी
५). राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत
६). छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल
७). सचिन पायलट
८). मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह
९). मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ
१०). काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा,
११). हिमाचल काँग्रेसच्या प्रमुख प्रतिभा सिंह
१२). काँग्रेसचे जेष्ठनेते मुकेश अग्निहोत्री
१३). काँग्रेसचे जेष्ठनेते सुखविंदर सिंग सुखू
१४). काँग्रेसनेते कन्हैया कुमार
१५). काँग्रेसनेते जगदीश ठाकोर
१६). काँग्रेसनेते सुखराम रथवा

इत्यादी नेत्यांचा समावेश या यादीत समावेश आहे.

Exit mobile version