HW Marathi
देश / विदेश राजकारण

बाहेर फिरताना हटकल्याने मुजोर तरुणाने थेट पोलीस उपनिरीक्षकाच्या अंगावर चढवली दुचाकी

मुंबई | देशात ‘कोरोना’चा वाढत संसर्ग लक्षात घेता पुढचे २१ दिवस पंतप्रधान मोदींनी संपूर्ण देशात लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले आहेत. इतके कडक आदेश असूनही अद्याप काही नागरिकांना याचे गांभीर्य लक्षात आलेले दिसत नाही. संपूर्ण देश लॉकडाऊन असतानाही अनेक जण क्षुल्लक कारणांसाठी घराबाहेर पडत आहेत. इतकेच नव्हे तर नागरिकांच्याच सुरक्षेसाठी दिवसरात्र तैनात असणाऱ्या पोलिसांनाच मुजोरी दाखवण्याचे प्रकार घडू लागलेत. काही मुजोर तरुणांकडून आज (२५ मार्च) वसई पूर्व गोखीवरे नाक्यावर आपले कर्तव्य बजावत असलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकाच्या अंगावर दुचाकी चढवून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. नागरिकांना गंभीर असल्याने इतक्या बिकट स्थितीतही नागरिकांना सुरक्षा देण्यात तैनात असणाऱ्या पोलिसांवर अशा पद्धतीने हल्ले होणे लज्जास्पद आहे.

पोलीस उपनिरीक्षक सुनील पाटील हे वसई पूर्व गोखीवरे नाक्यावर ड्युटीवर असताना त्या मुजोर तरुणांनी त्यांच्या अंगावर दुचाकी चढवून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला. दरम्यान, यामध्ये सुनील पाटील हे गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला मोठी दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे. त्यांना सध्या तेथील जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बुधवारी (२५ मार्च) सकाळी ११ च्या सुमारास काही तरुण विनाकारण दुचाकी फिरवत असताना दिसल्यावर पोलिसांनी त्यांना हटकले. तसेच थांबण्याचा इशाराही दिला. मात्र, तरीही ते पळू जाण्याचा प्रयत्न करू लागले. यावेळी त्यांना पकडताना त्यातील एका तरुणाने थेट सुनील पाटील यांच्या अंगावरच चक्क दुचाकी गाडी चढवली. त्यानंतर ते सर्वजण पळून गेले. मात्र, त्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

Related posts

उन्नाव बलात्कार प्रकरण । ७ दिवसांत तपास पूर्ण करण्याचे आदेश

News Desk

राज्यात कुठेही अन्नधान, फळ भाजीपालासह औषधांचा तुटवडा भासणार नाही, राज्य सरकारची माहिती

News Desk

मोदीजी, कोरोनामुळे हजारो चिता जळत आहेत, आता तरी जनतेच्या जिवीतास गांभीर्याने घ्या !- नाना पटोले

News Desk