Site icon HW News Marathi

प्रत्येक देशवासीयाला सोबत घेऊन जाण्याची BJPची राजकीय संस्कृती! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी भाजपच्या 44 वा स्थापना दिवस आहे. भाजपच्या (BJP) वर्धापन दिनानिमित्ताने पंतप्रधानांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी पंतप्रधानांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. “काँग्रेस हे  वंशवाद, परिवारवाद, जातीवाद, श्रेत्रवाद हीच त्यांची ओळख. प्रत्येक देशावासीयाला सोबत घेऊन चालण्याची भाजपची राजकीय संस्कृती आहे”, असे म्हणत पंतप्रधानांनी काँग्रेसवर टीकास्त्र केले.

पंतप्रधान म्हणाले, “काँग्रेस आणि इतर पक्षांची संस्कृती ही आपण पाहू शकता. ते  वंशवाद, घराणेशाही, जातीवाद आणि प्रादेशिकवाद हीच त्यांची ओळख आहे. प्रत्येक देशावासीयाला सोबत घेऊन चालण्याची भाजपची राजकीय संस्कृती आहे. काँग्रेस आणि इतर पक्षांची संस्कृती छोटा विचार करायचा, छोटा स्वप्ने बघायची आणि त्यात छोटे यश मिळाले की आनंद साजरा करायचा. एकमेकांची पाठ थोपटायची. भाजपाची राजकीय संस्कृती मोठी स्वप्ने बघणे आणि ते स्वप्न पुर्ण करण्यासाठी जीवतोड मेहनत करणे.”

भाजपची स्थापना 6 एप्रिल 1980 रोजी झाली. यापूर्वी भाजपचे नाव जनसंघ असे होते. 1977 मध्ये जनता पक्षात विलीन झाले. पंतप्रधाना पुढे म्हणाले, “गेल्या काही वर्ष सामाजिक न्यायाच्या नावावर राजकारण करत होते. याच पक्षाचे पाध्यक्ष आपल्याच कुटुंबाचे हित जोपासत. परंतु, समाजाचे अजिबात नाही. परंतु, भाज सामाजिक न्याय जगते.”

 

Exit mobile version