Site icon HW News Marathi

भाजपची १५ राज्यांसाठी नव्या प्रभारींची नियुक्ती; महाराष्ट्रातील ‘या’ नेत्यांकडे मोठी जबाबदारी

मुंबई। भाजपने (BJP)२०२४ लोकसभा निवडणुकीच्या (2024 Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पातळीवर पक्षात मोठे बदल केले आहे. भाजपने आज (९ सप्टेंबर) १५ राज्यांसाठी नव्या प्रभारी आणि सहप्रभारीची नियुक्ती केली आहे. यानुसार, राज्याचे माजी मंत्री विनोद तावडे यांना बिहारचे प्रभारी केले आहे. तर प्रकाश जावडेकर यांना केरळचा प्रभारी बनविले असून मध्य प्रदेशात पंकजा मुंडे यांना सहप्रभारी बनविले आहे. या भाजपने त्यांच्या अधिकृत ट्रविटर अकाऊंटवर १५ राज्याच्या नवीन प्रभारी आणि सहप्रभारीची नावांची यादी जाहीर केली आहे.

दरम्यान, छत्तीसगढमध्ये ओम माथूर यांची नियुक्ती, पश्चिम बंगालमध्ये मंगल पांडे यांची प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. बिप्लब कुमार देव हरियाणाच प्रभारी, लक्ष्मीकांत वाजपेयी झारखंडचे प्रभारी, राधामोहन अग्रवाल लक्षद्वीपचे प्रभारी, पी. मुरलीधर राव हे मध्य प्रदेशचे प्रभारी झाले आहेत. त्याचबरोबर विजय रूपाणी पंजाब आणि चंदीगढचे प्रभारी, अरूण सिंह राजस्थानचे प्रभारी, तरुण चुघ तेलंगणाचे प्रभारी, महेश शर्मा त्रिपुराचे प्रभारी आणि संबित पात्रा यांच्याकडे ईशान्येकडील राज्याचे प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे.
Exit mobile version