Site icon HW News Marathi

भाजप नेत्या सोनाली फोगाट यांचे गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन

मुंबई | भाजप (BJP) नेत्या आणि अभिनेत्री सोनाली फोगाट (Sonali Phogat) यांचे निधन झाले आहे. फोगाटला गोव्यामध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली. फोगाटला भाजपने हिसार जिल्ह्यातील आदमपूर विधानसभेतून उमेदवारी दिली होती. परंतु, या निवडणुकीत फोगाट यांचा पराभव झाला. यानंतर भाजपने हरियाणा युनिट फोगाटची महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती केली होती.

फोगाट यांचा जन्म 21  सप्टेंबर 1979 रोजी हरियाणातील फतेहाबाद येथे झाला होता. फोगाटने सुरुवातीच्या काळात अँकरिंग, मॉडेलिंग आणि अभिनेत्री म्हणून काम केले होते. यानंतर फोगाट यांनी देशात टिकटॉक स्टार म्हणून प्रसिद्ध झाल्या होत्या. भाजपने फोगाट यांच्याकडे आदिवासी भागात काम करण्याची जबाबदारी सोपवली होती.

फोगाट यांनी 2006 मध्ये हिसार दूरदर्शनमध्ये अँकरिंग करून करिअरची सुरुवात केली. यानंतर 2008 मध्ये फोगाट यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. दरम्यान, फोगाट यांचे पती संजय यांचा मृत्यू 2016 मध्ये झाला होता. फोगाट यांच्या पतींचा  संशयास्पद परिस्थीत झाला होता. यानंतर फोगाट प्रकाश झोपात आले होत्या.

 

 

 

 

Exit mobile version