HW News Marathi
देश / विदेश

लखीमपूर हिंसाचाराचा व्हिडीओ ट्वीट करणाऱ्या वरुण गांधींबाबत भाजपाचा मोठा निर्णय

दिल्ली | भाजपानं आपली राष्ट्रीय कार्यकारिणीची नवी यादी आज जाहीर केली आहे. या यादीत पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना स्थान देण्यात आलं आहे. गेल्यावेळी लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना मार्गदर्शक म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, आता राष्ट्रीय कार्यकारिणीत त्यांचा समावेश करण्यात आला आहे. भाजपानं राष्ट्रीय कार्यकारिणीसाठी ८० सदस्यांची यादी जाहीर केली असून यामध्ये वरुण गांधींना स्थान देण्यात आलेलं नाही. विशेष म्हणजे मनेका गांधी यांनाही पक्षाने वगळलं आहे. भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांनी ही यादी जाहीर केली आहे.

शेतकऱ्याच्या मनात क्रूरता आणि अहंकाराचा संदेश पोहोचण्यापूर्वी न्याय झाला पाहिजे

वरुण गांधी लोकसभेत पिलभित मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात, तर मनेका गांधी सुलतानपूर येथून खासदार आहेत.दरम्यान सध्या लखीमपूर हिंसाचारावरुन विरोधक धारेवर धरत असताना पक्षाला घऱचा आहेर देणाऱ्या वरुण गांधींना मात्र भाजपाने मोठा धक्का दिला आहे. कृषी कायदे असोत किंवा लखीमपूर खेरी हिंसाचार…वरुण गांधी नेहमीच आपलं परखड मत मांडत आले आहेत. गुरुवारी त्यांनी लखीमपूर खेरी येथील घटनेचा व्हिडीओ ट्वीट करत आरोपींना अटक करण्याची मागणी केली होती.ट्विटरला व्हिडीओ शेअर करताना वरुण गांधी म्हणाले की, “या व्हिडीओत सर्व काही स्पष्ट आहे. हत्या करुन आंदोलकांना शांत केलं जाऊ शकत नाही. निष्पाप शेतकर्‍यांच्या रक्तासाठी जबाबदार घेणं आवश्यक आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात क्रूरता आणि अहंकाराचा संदेश पोहोचण्यापूर्वी न्याय झाला पाहिजे”.

लखीमपूर खेरी हिंसाचाराचा एक नवा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत भरधाव वेगाने धावणारी एसयुव्ही शेतकऱ्यांना चिरडून पुढे जात असल्याचं दिसत आहे. विरोधी पक्षातील नेत्यांनी हा व्हिडीओ शेअर करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. भाजपा खासदार वरुण गांधी यांनीदेखील व्हायरल झालेला हा व्हिडीओ शेअर करत पक्षाला घऱचा आहेर दिला. वरुण गांधी यांनी यावेळी ही हत्या असल्याचं म्हटलं आहे.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निर्भया प्रकरणातील आरोपीची फाशीची शिक्षा कायम

News Desk

…म्हणून भारताचा आर्थिक विकास वेग कमी झाला, रघुराम राजन यांची टीका

News Desk

द्राविडी चळवळीचे प्रणेते पेरियार यांच्या पुतळ्याची विटंबना,डोक्यावर ठेवले चप्पल

News Desk