Site icon HW News Marathi

बोरिस जॉन्सन यांनी ब्रिटनच्या पंतप्रधान पदाचा दिला राजीनामा

मुंबई। बोरिस जॉन्सन यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानचा राजीनामा दिला आहे. बोरिस जॉन्सनच्या सरकारमधील ४० पेक्षा जास्त मंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. यामुळे ब्रिटिनमध्ये सरकार कोसळले असून परंतु, पुढील पंतप्रधानांची घोषणा होईपर्यंत बोरिस जॉन्सन काळजीवाहू म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत.
दरम्यान, बोरिस यांनी त्यांच्या सरकारमध्ये लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या क्रिस पिंचर यांना घेतले होते. यामुळे बोरिस जॉन्सन यांचे मंत्रिमंडळ यावर नाराज होते. यानंतर बोरिस यांच्या सरकारमध्ये नाराजीचे सुर अवळण्यास सुरुवात झाली. ब्रिटनचे अर्थमंत्री ऋषी सुनक यांनी प्रथम ५ जुलै रोजी राजीनामा दिला. यानंतर एकापाठोपाठ जवळपास ४० पेक्षा जास्त मंत्र्यांनी राजीनामा दिला. यामुळे बोरिस यांचे सरकार कोसळले.
Exit mobile version