Site icon HW News Marathi

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं निधन 

मुंबई। ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II) आज निधन झाले आहे. क्वीन एलिझाबेथ द्वितीय यांनी वयाच्या ९६ वर्षी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले आहे. महाराणी एलिझाबेथ द्वितीय स्कॉटलंडमधील बाल्मोरल कॅसल येथे अखेरचा श्वास घेतला. एलिझाबेथ द्वितीय सात दशके ब्रिटनच्या महाराणी पदावर विराजमान होत्या. महाराणींच्या निधनानंतर त्यांचे पुत्र प्रिन्स चार्ल्स ब्रिटनचे राजा होणार आहेत.

महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनाची बातमी मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पंतप्रधानांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हणाले, “२०१५ आणि २०१८ मध्ये ब्रिटनच्या दौ-यादरम्यान एलिझाबेथ द्वितीय यांच्या भेट झाली असून त्यांच्या भेट ही अविस्मरणीय आहे. मी त्यांचा दयाळूपणा कधीही विसरू शकत नाही. त्यांनी एका भेटीत महात्मा गांधींनी त्यांना लग्नात दिलेला रुमाल दाखवला होता. मी ते कायमस्वरूपी लक्षात ठेवणे. “
Exit mobile version