HW News Marathi
देश / विदेश

Budget 2022: येत्या ३ वर्षांत ४०० नवीन वंदे भारत ट्रेन धावणार! अर्थमंत्र्यांची घोषणा

नवी दिल्ली | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत देशाचा अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात केली आहे. यावेळी निर्मला सीतारामन यांनी ४०० नव्या वंदे भारत रेल्वे सुरू करण्याचा मोठा निर्णय जाहीर केला आहे. पुढील तीन वर्षांत या गाड्या चालवल्या जातील, असं अर्थमंत्र्यांनी म्हंटलं आहे. याशिवाय १०० पीएम गती शक्ती कार्गो टर्मिनल विकसित केले जातील, असेही त्यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर देशातील विविध शहरात मेट्रोचं जाळं सुद्धा वाढवणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

कोरोनामुळे बसलेल्या आर्थिक फटक्यातून दिलासा मिळावा यासाठी रेल्वेसाठी अर्थमंत्री कोणती घोषणा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. अशातच अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात आज रेल्वेबाबत मोठी घोषणा करत ४०० वंदे भारत ट्रेन्स सुरू करणार असल्याची माहिती दिली. या निर्णयामुळे यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये सुवर्ण चतुर्भुज मार्गावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या मार्गांवर ताशी १८० ते २०० किमी वेगाने धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस सेमी-हायस्पीड ट्रेन्स चालवण्याची घोषणा करण्यात आली आहे. तर या नवीन ट्रेनमध्ये रिक्लाइनिंग सीट्स, बॅक्टेरिया फ्री एअर कंडिशनिंग सिस्टीमचा वापर तसेच पुशबॅक फीचर मिळेल. 

दरम्यान, यावेळी देशाचा आर्थिक विकास दर ९.२ टक्के राहण्याचा अंदाज आहे. तसेच हा अर्थसंकल्प पुढील २५ वर्षांसाठी ब्लू प्रिंटचे काम करणार, असा आशावादही त्यांनी केला आहे. शिवाय या अर्थसंकल्पातून ६० लाख नोकऱ्या निर्माण करण्यात येणार आहेत, अशी माहिती देखील सीतारामन यांनी दिली आहे. तर एलआयसीच्या आयपीओवर काम सुरू असून लवकच बाजारात आणला जाईल, तसेच येत्या काही दिवसांत आणखी काही गोष्टींची निर्गुंतवणूक केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आम्ही लक्ष्य पूर्ण करतो, किती दहशतवाद्यांचा खात्मा झाला हे मोजणे आमचे काम नाही !

News Desk

काँग्रेसचे खासदार शांतनू सेन राज्यसभेतून निलंबित!

News Desk

सरकारचा ‘फेक न्यूज’ संदर्भातील निर्णय मागे

News Desk