Site icon HW News Marathi

राबडी देवींच्या घरी CBI चा छापा; काय आहे नेमके प्रकरण

मुंबई | बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी (Rabri Devi) यांच्या घरी सीबीआयने (CBI) छापा टाकला आहे. जमीनीच्या बदल्यात रेल्वेमध्ये नोकरी घोटाळ्याप्रकरणी (land-for-job case) सीबीआयने आज (6 मार्च) सकाळी राबडी देवींच्या घरी दाखल झाले आहेत. यावेळी बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हे घरीच असल्याची माहिती माध्यमातून मिळाली आहे.

यापूर्वी सीबीआयने लालू यादव, राबडी देवी, मिसा भारती यांच्यासह 14 जणांना समन्स पाठविले होते. लालू यादव यांच्या कुटुंबियानी जमिनीच्या बदल्यात 7 जणांना रेल्वेत नोकरी दिल्याचा आरोप आहे. या 7 जणांपैकी 5 जणांच्या जमनीची विक्री झाली होती. तर 2 जणांनी लालू यादव यांना त्यांची जमीनी भेट दिली.

रेल्वेमध्ये नोकरीच्या बदल्यात जमीन लाच म्हणून घेतल्याप्रकरणी सीबीआय तपास करत आहे. या प्रकरणी सीबीआने चार्जशीट दाखल केली आहे. या चार्जशीटमध्ये लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबियां व्यतिरिक्त निकटवर्तीयांमध्ये माजी आमदार भोला यादव आणि ह्रदयानंद चौथरी यांच्यावर देखील आरोप आहेत.या प्रकरणी सीबीआयने भोला यादव यांना 27 जुलै रोजी अटक केली होती. भोला यादव हे 2004 ते 2009 दरम्यान लालू यादव यांचे ओएसडी होते.

काय आहे प्रकरण

लालू प्रसाद यादव यांनी रेल्वेमंत्री असताना लँड फॉर जॉब घोटाळा झाला होता. हा घोटाळा 14 वर्ष जुने हे प्रकरण आहे. लालू प्रसाद यादव हे 2004 ते 2009 मध्ये रेल्वेमंत्री होते. या प्रकरणी सीबीआयने 18 मे रोजी गुन्हा नोंदविला होता. यात लालू यादवांच्या परिवाने 1. 05 लाख स्क्वेअर फुट जमिनीवर कब्जा केल्याचा दावा सीबीआयने केला आहे. लालू यादवांनी 7 जणांना रेल्वेमध्ये जमिनीच्या बदल्यात नोकरी दिल्याचा दावा सीबीआयकडून करण्यात आला होता.

 

Exit mobile version