Site icon HW News Marathi

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या निवासस्थाना परिसरात सापडला जिवंत बॉम्ब

मुंबई | पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (CM Bhagwant Mann) यांच्या चंदीगड येथील निवासस्थानापासून 500 मीटर अंतरावर जिवंत बॉम्ब आढळला. बॉम्ब सापडल्याची बातमी मिळताच पंजाबमध्ये एकच खळबळ उडाली. या परिसरवर नियंत्रणात आणण्यासाठी बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. भगवंत मानच्या निवासस्थानापासून असलेल्या हेडिपॅडवरून बॉम्ब चंदीगड पोलीस आणि बॉम्ब शोधक पथकाने आज (2 जानेवारी) जिवंत बॉम्ब आढळला.

दरम्यान, हरियाणा आणि पंजाब या दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्याचे निवासस्थान जवळ आहे. भगवंत मान यांच्या निवासस्थानाजवळ आंब्याची झाले. बॉम्ब शोधक पथकाने हा बॉम्ब निकाली केला असून बॉम्ब सापडलेला संपूर्ण परिसरात नाकेबंदी केला आहे. तसेत भगवंत मान यांच्या निवासस्थानापर्यंत हा बॉम्ब कसा आला, याचा शोध घेतला जात आहे”, अशी माहिती चंदिगडच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी संजीव कोहली यांनी सांगितले.

Exit mobile version