HW News Marathi
देश / विदेश

“हम जीत नहीं रहे तो…”, काँग्रेसच्या अलका लांबांनी निकालाआधीच मानली हार

नवी दिल्ली | दिल्ली विधानसभा निवडणुकीचा आज (११ फेब्रुवारी) निकाल जाहीर होणार आहे. दिल्ली निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून आप आघाडीवर आहे. यामुळे दिल्ली पुन्हा एकदा आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांची सरकार येणार असल्याची दाट शक्यात वर्तवली जात आहे. दिल्लीत आप आणि भाजपमध्ये निवडणुकीच्यात चुरस पाहायला मिळेत तर काँग्रेस अद्याप खाते देखील उघडले नाही. काँग्रेसच्या उमेदवारांनी निकालापूर्वी हार मानली आहे.

चांदनी चौक विधानसभा मतदार संघातील काँग्रेसच्या उमेदवार अलका लांबा यांनी निवडणुकीच्या निकालापूर्वी ट्विट करत हार मानली आहे. अलका लांबा ट्वीटमध्ये म्हणाल्या की, “माझा मुलगा मला म्हटला की, आई काजी करून नको, आम्ही जिंकत नाही आहोत, तर हारत सुद्धा नाही आहोत.” ”हृतिक (माझ्या मुलगा) : आई चिंता करू नकोस, आम्ही जिंकत नाही आहोत तर हारत सुद्धा नाही आहोत.” याशिवाय दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, “हम होंगे कामयाब…”.

दिल्ली विधानसभेसाठी शनिवारी (८ फेब्रुवारी) मतदान अलका लांबा यांनी आपच्या कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावली होती. आपच्या कार्यकर्त्यांने अलका लांबांवर आक्षेपार्ह टीपण्णी केली होती. या प्रकारामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी आपच्या त्या कार्यकर्त्याला ताब्यात घेतले होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनावर मात करण्यासाठी भारताला वर्ल्ड बॅंकेने दिले आर्थिक सहाय्य

News Desk

पंतप्रधान मोदींच्या हॅलिपॅडसाठी तब्बल १००० झाडांची कत्तल

News Desk

उद्धव ठाकरेंनी सोबत घेतलेल्या ‘त्या’ दोन भुतांचा देवावर विश्वास नाही !

News Desk