Site icon HW News Marathi

अर्थसंकल्प सादर करताना काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांकडून झाली मोठी चूक

मुंबई | राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी राज्याचा 2023-24 चा अर्थसंकल्प सादर  (Budget)करत केला. अशोक गेहलोत हे आज (10 फेब्रुवारी) त्यांच्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी अशोक गेहलोत यांनी चक्क गेल्या वर्षाचा जुना अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवातच केली होती. परंतु, अशोक गेहलोत यांनी 10 मिनिटे जुनाच अर्थसंकल्प वाचत होते. या संपर्ण प्रकार विरोधी पक्षाच्या लक्ष्यात आल्यानंतर सर्व जण हसू लागले. यानंतर सभागृहात एकच हषा पिकला. यामुळे सभापतींनी सभागृहाचे कामकार अर्था तासासाठी तहकूब केले.

 

दरम्यान, अशोक गहलोत जुना अर्थसंकल्प वाचून दाखविल्यासंदर्भात सभागृहात माफी मागितली. परंतु, विरोधकांनी मुख्यमंत्र्यांच्या या कृतीची निंदा करत सभागृहात गोंधळ घातला. यामुळे सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले. राज्यस्थानच्या इतिहासात पहिल्याच अर्थसंकल्प सादर करताना सभागृहाचे कामकाज स्थगित केले गेले. अशोक गहलोत अर्थसंकल्प ब्रीफकेसमध्ये जुन्या अर्थसंकल्पाची काही पाने आल्याने हा गोंधळ झाला असून या प्रकरणी अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा असल्याचे म्हटले.

 

अर्थसंकल्प सादर करताना अशोक गहलोत नेमके काय म्हणाले

अर्थसंकल्प सादर करताना अशोक गहलोत सभागृहात म्हणाले, “इंदिरा गांधी शहरी रोजगार हमी योजना जाहीर केल आहे. याअंतर्गत शहरातील लोकांना 100 दिवसांचा रोजगार मिळणार असून यासाठी दरवर्षी 800 कोटी रुपये खर्च केले जाणार आहे,” असे भाषण देत असताना त्यांच्या सरकारमधील पाणी पुरवठा मंत्र्यांनी त्यांना मध्येच रोखून त्यांना सांगितले.  या प्रकरणी अशोक गहलोत माध्यमांशी बोलताना म्हणाले, “अर्थसंकल्पाच्या फाईलमध्ये एक पान हे गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पाचे आले होते. परंतु, मी वाचत असलेल्या अर्थसंकल्पीय भाषणाची प्रत तुम्हाला दिली जाईल”, असे ते म्हटले.

 

 

 

Exit mobile version