Site icon HW News Marathi

“राज्याला उद्योग-प्रकल्प आणि गुंतवणुकीत सहकार्य करावे”, मुख्यमंत्र्यांचा पंतप्रधानांना फोन

मुंबई | “राज्याला उद्योग-प्रकल्प आणि गुंतवणुकीत सहकार्य करावे”, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना केली आहे. मुख्यमंत्र्यांनी वेदांता-फॉक्सकॉनचा (Vedanta-Foxconn) प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रदानांशी चर्चा करताना विनंती केली. वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यामुळे शिंदे सरकारवर विरोधकांनी सडकून टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना काल (13 सप्टेंबर) रात्री दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती माध्यमातून मिळाली आहे.

दरम्यान, राज्यातील वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प चर्चावर मुख्यमंत्र्यांनी प्रसार माध्यमांशी चर्चा करताना म्हणाले, “राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार स्थापन होऊन दोनच महिने झाले आहेत. यात मुख्यमंत्र्यांनी वेदांताचे मालक अनिल अग्रवाल, फॉक्सकॉन आणि केपीएमजी यांच्यासोबत एक बैठक झाली होती. या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. या प्रकल्पाला राज्य सरकारकडून ज्या सवलती देणे शक्य आहे. त्या सर्व दिल्या जातील.”

मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्या काल फोनवरून अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकल्पाने राज्यात 1 लाख कोटीहून अधिक गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती होणार होती. पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या फोनवर नेमके काय आश्वासन दिले, हे पाहावे लागणार आहे.

 

 

 

Exit mobile version