Site icon HW News Marathi

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर; मोदी-शहांची भेट घेणार ?

मुंबई | राज्यात वेदांता प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यानंतर विरोधकांनी शिंदे सरकारवर हल्लाबोल केला. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आज (21 सप्टेंबर) दिल्ली (Delhi) दौऱ्यावर जाणार आहेत. मुख्यमंत्री दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेणार आहे. या दिल्ली दौऱ्या मुख्यमंत्री शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तारसंदर्भात चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेण्याच्या चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

वेदांता महाराष्ट्रातून गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांशी फोनवर चर्चा करत केली होती. त्यावेळी पंतप्रधानांनी मोठे प्रकल्प महाराष्ट्रात येतील, असे आश्वासन दिले होते. यामुळे आजचा दिल्ली दौरा महत्वाचा मानला जातो. या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री राज्यासाठी काय घेऊन येणार, याकडे सर्वांच लक्ष लागले.

मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यावर उद्योगमंत्री उदय सामंत, कृषीमंत्री अब्दुल सत्तार आणि रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे यांच्यासोबत दिल्लीत जाणार आहेत. तसेच शिंदे गटातील आमदार व खासदार खरी शिवसेना असल्याचे काही कागदपत्रे निवडणूक आयोगाकडे सादर करण्याचे माहिती माध्यमातून मिळाली आहे.

 

 

Exit mobile version