HW News Marathi
देश / विदेश

कॉंग्रेसने केले भारत बंदचे आवाहन

नवी दिल्ली | अनुसूचित जाती-जमातींवरील कायदा विरोधात सवर्णांच्या निषेधानंतर केंद्र सरकारला पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींवर कॉंग्रेस घेराव घालणार आहे. १० सप्टेंबर रोजी कॉंग्रेसकडून भारत बंदचे आवाहन करण्यात आलेले आहे.

काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, देशाचा आणि देशातील जनतेचा राग लक्षात घेऊन पक्षाने १० सप्टेंबर रोजी बंदचे आवाहन केला आहे. हा भारत बंद सकाळी 9 वाजेपासून दुपारी 3 पर्यंत असणार आहे. कारण कोणत्याही नागरींकांना या बंदचा त्रास होऊ नये असा पक्षाचा हेतू आहे.

सुरजेवाला म्हणाले की, आंतरराष्ट्रीय किंमती कमी असतानाही देशभरातील तेलाचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यांनी सांगितले की डॉलरच्या तुलनेत रुपया ७२ ने मागे गेला आहे. यावेळी यांनी मोदी सरकारवर आरोप करत गेल्या साडेचार वर्षांपासून पेट्रोल आणि डिझेलवर कर भरुन सुमारे ११ लाख कोटी रूपये सरकारने कमाई केल्याचे म्हटले आहे. आद्यप सरकारने याचे स्पष्टीकरण दिलेले नाही.

आरटीआयचा हवाला देऊन सुरजेवाला यांनी आरोप केला की, जगात असे २९ देश आहेत जिथे मोदी सरकार ३४ रुपये प्रतिलिटर व ३७ रुपये प्रति लिटर किंमतीने तेल विकते. त्यांनी सांगितले की पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी जीएसटीमध्ये पेट्रोल आणि डिझेल आणण्यासाठी केंद्राला विनंती करत आहेत. त्यामुळे सामान्य जनतेला 10 ते 15 रुपये सूट मिळेल. परंतु सरकार अद्याप कोणताही निर्णय घेत नाही.

सुरजेवाला यांनी सरकारवर ११ लाख कोटी रुपयांचा तेल घोटाळा केल्याचा आरोप केला तेव्हाच त्यांनी जनतेला या दरातून सुटका मिळावी म्हणून देशव्यापी आंदोलनाचा इशारा दिला. यावेळी बोलताना ते म्हणाले, जेव्हा काँग्रेसने सत्ता सोडली तेव्हा गॅस सिलिंडरची किंमत ४०० रुपये होती ती आत्ता भाजप सरकारच्या काळात ८०० रुपयांवर येऊन पोहचली आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सुपरस्टार रजनीकांत यांचा राजकारणात येण्याचा निर्णय मागे 

News Desk

मराठा आरक्षणाची ८ मार्चपासून प्रत्यक्ष सुनावणी होणार

News Desk

श्रीनगरमधील बाजारात ग्रेनेड हल्ला, १५ जण जखमी तर एकाचा मृत्यू

News Desk