Site icon HW News Marathi

मानहानी प्रकरणी राहुल गांधींना सूरत न्यायालयाकडून जामीन मंजूर; जाणून घ्या संपर्ण प्रकरण

मुंबई | मानहानी प्रकरणी काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना सूरत न्यायालयाने दोषी ठरविले आहे. राहुल गांधी यांनी ‘मोदी’ या आडनावाची मानहानी केल्या प्रकरणामध्ये सूरत न्यायालयाने (Surat Court) त्यांना दोषी ठरविण्यात आले आहे. न्यायालयाने राहुल गांधीला दोन वर्षाची शिक्षा सुनावली. परंतु, काही वेळातच राहुल गांधींना न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला. राहुल गांधींना 15 हजाराच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे.

गुजरात भाजपचे आमदार पुर्णेश मोदी यांनी राहुल गांधी विरोधात सूरत न्यायालयात मानहानीची याचिका दाखल केली होती. या प्रकरणात कलम 499, कलम 500  या कलमा अंतर्गत त्यांनी याचिका केली होती. आणि या प्रकरणात सूरत न्यायालयाने राहुल गांधींना शिक्षा सुनावली आहे. पण, न्यायालयाने राहुल गांधींना जामीन देखील मंजूर करण्यात आला.

2019च्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान राहुल गांधींनी हे वक्तव्य केले होते. राहुल गांधींनी हे वक्तव्य कर्नाटकमध्ये केले होते. मोदी आडनावावरून टीका केली होती. “सर्वच चोरांचे नावे ही मोदी का असतात. यात नीरव मोदी, ललित मोदी अशी नावे घेतली,” असे विधान राहुल गांधी करत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. राहुल गांधींच्या वक्तव्यावरून सूरतमधील स्थानिक न्यायालयात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झालेला होता. या प्रकरणात न्यायालयाने आज (23 मार्च) राहुल गांधींना दोषी ठरविले आहे. या प्रकरणी न्यायालय राहुल गांधींना नेमकी काय शिक्षा देईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

दरम्यान, राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा सोळावा दिवस आहे. सत्ताधाऱ्यांनी राहुल गांधी विरोधात विधिमंडळात जोडे मारो आंदोलन केले. यावेळी सत्ताधाऱ्यांनी राहुल गांधीचे बॅनरला जोडे मारले. सत्ताधाऱ्यांच्या आंदोलनाचे पडसाद विधिमंडळात पडतील का? हे पाहावे लागेल.

 

Exit mobile version