Site icon HW News Marathi

मल्लिकार्जुन खरगे काँग्रसेचे नवे अध्यक्ष

नवी दिल्ली | काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी काँग्रेसच्या अध्यक्ष (Congress President) पदाची निवडणूक जिंकले आहे. मल्लिकार्जुन खरगे हे 7 हजार 897 मताने विजयी झाले आहे.  तब्बल दोन दशकानंतर पहिल्यांदाच गांधी कुटुंबाबाहेरील काँग्रेसला अध्यक्ष मिळाला आहे. या काँग्रेसच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत  मल्लिकार्जुन खरगे विरुद्ध काँग्रेसचे लोकसभेचे खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) यांच्यात थेट सामना रंगला होता. काँग्रेस अध्यक्ष पदासाठी सोमवारी (17 ऑक्टोबर) मतदान पार पडले होते. या काँग्रेस अध्यक्ष पदाची निवडणुकीचा आज (19 ऑक्टोबर) निकाल

तर काँग्रेसचे लोकसभेचे  खासदार शशी थरूर  यांना 1 हजार 72 मते मिळाली आहे. काँग्रेस पदाच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत 416 मते बाद झाली आहे. देशभरातून काँग्रेसच्या अध्यक्ष पदासाठी 9 हजार 385 एकूण मतदान झाल आहे. खरगेंची अध्यक्ष पदी विजयी झाल्यानंतर थरूर यांनी ट्वीट करत अभिनंदन केले आहे. खरगेंनी काँग्रेसच्या अध्यक्ष पदी विराजमान झाल्यानंतर पक्षात नवचैतन्य आणण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. काँग्रेस अध्यक्ष पदासाठी सोमवारी (17 ऑक्टोबर) मतदान पार पडले होते.

शशी थरूर यांचा काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पराभव झाला. तर थरूर यांनी ट्वीट करत खरगेंना अभिनंदन केले आहे. यात थरूर म्हणाले, “काँग्रेसच्या अध्यक्ष पदी खरगे यांचा विजय झाला आहे. मला मत देणाऱ्या काँग्रेसजनांचे मी मनापासून आभार मानते.”

Exit mobile version