HW News Marathi
देश / विदेश

काँग्रेसचा आम आदमी पक्षाला जोरदार धक्का 

अहमदाबाद – गुजरात निवडणूकीत काँग्रेस एका मागोमाग एक असे धक्के आपल्या विरोधकांना देत आहेत. त्यात आता आम आदमी पक्षाला ही काँग्रेसने धक्का देत गुजरात निवडणूक एकतर्फी होणार नाही असाच संदेश भाजपला दिला आहे. आम आदमी पक्षाच्या गुजरात महिला शाखेच्या प्रदेशाध्यक्ष वंदना पटेल, लोकसभेचे माजी उमेदवार ऋतुराज मेहता यांच्यासह जवळपास १०० नेते आणि कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये जाहीर पणे प्रवेश केला आहे. त्यातील ऋतूराज मेहता यांनी मागिल लोकसभा निवडणूक आम आदमी पक्षाच्या तिकीटावर गांधीनगर मधून भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या विरोधात लढली होती. तर वंदना पटेल यांनी मेहसाणा मतदारसंघात २०१४ ची लोकसभा निवडणूक आपच्या तिकिटावर लढवली होती. आम आदमी पक्षाचे जवळपास १०० पेक्षा जास्त नेते आणि कार्यकर्ते काँग्रेसमध्ये सहभागी झाले असल्याची माहिती यावेळी काँग्रेसचे प्रवक्ता मनीष दोशी यांनी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप

Gauri Tilekar

भाजपच्या पराभवाची मालिका आता थांबणार नाही, पवारांनी केले ‘आप’चे अभिनंदन

swarit

पतंप्रधान नरेंद्र मोदींची देहरादूनमध्ये योगासने

swarit